'पूरा नाम मनोज अरविंद चव्हाण' बहुतेक वेळा फोनवर मनोज अशीच आपली ओळख सांगतो. मनोज अरविंद चव्हाण या नावात पत्रकारिता, मैत्री, आपुलकी, योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या प्रशासनाविरुद्धचा रोष, क्रिकेट आणि बरच काही सामावल आहे. 1997 पासून ते आजातागातय मालवणने मनोजमधले अनेक पैलु पाहिले आहेत. बातमीपर्यंत सर्वात अगोदर पोहचणे हि मनोजची खासियत आहे. त्यात जर क्राईमची बातमी असेल तर मनोज आणखी वेगाने बातमीपर्यंत पोहचतो. अपघात, खून, गळफास, अपहार या बातम्या मनोज ज्या पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. क्राईमच्या प्रत्येक बातमीत त्याने केलेले निरीक्षण दिसून येते. कुठलीही बातमी पोलीस स्टेशनला येऊन संपणार आहे, त्यामुळे क्राईमच्या बातमी मागे रहा असे तो नेहमी सांगतो. पत्रकाराने बातमी लिहणे हे सोपे असते पण ती बातमी विविध सोर्सच्या आधारे लवकरात लवकर मिळवणे हे कौशल्याचै काम आहे. मनोजने हे कौशल्य आत्मसात केले आहे. मनोजचा जनसंपर्क मोठा आहे. हाच जनसंपर्क त्याला बातमीपर्यंत घेऊन जातो. मालवण हे पर्यटन स्थळ असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येतात. मालवण समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडत असतात. बुडालेल्या पर्यटकांची बातमी मिळवणे कठीण काम असते. समुद्रकिनारा, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन अशी पत्रकारांची धावपळ सुरु असते. या धावपळीत मनोज पुढे असतो. बातमी मिळवण्याबरोबरच बुडालेल्या कुटुंबाना आधार देण्याचेही काम करतो. अपघाताची बातमी करताना अपघातग्रस्त रुग्णाला वैद्यकीय मदत कशी मिळेल याकडेही मनोजचे लक्ष असते. मी 2008-2011 या कालावधीत दै. रत्नागिरी टाईम्समध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळेस मनोज तरुण भारतची वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळायचा. 2016 मध्ये मी तरुण भारत मध्ये रुजू झालो तेव्हा मनोज तरुण भारतचा मालवण प्रतिनिधी होता. परंतु वार्ताहर मनोज आणि प्रतिनिधी मनोज यामध्ये मला कोणताही फरक जाणवला नाही. प्रतिनिधी म्हणून काम करताना मनोज प्रत्येक वार्ताहराकडून चांगले काम करुन घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वार्ताहाराने अधिकाधिक लिहावे हि त्याची अपेक्षा असते. सहवेदनेची बातमी मिळालीच पाहिजे हा मनोजचा आग्रह असतो. निधन झालेल्या व्यक्तीच्य पश्चात कोण आहेत? नातेवाईक कोण आहेत? हि माहिती योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी वार्ताहारांनी प्रयत्न करावे असे त्याचे नेहमीच सांगणे असते. पत्रकाराला कोणतीही बातमी लिहता आली पाहाजे हे मनोजचे नेहमी सांगणे असते. हे सांगताना तो स्वतः कुठेही मागे राहत नाही. ज्या प्रमाणे तो क्राईमची बातमी लिहतो त्याच ताकदीने तो क्रिडा, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील बातम्या लिहितो. मनोज गेली 23 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहे. तो पत्रकारित वेगवेगळे विषय हाताळतो. पण अननोन किंवा मोगम बातमी लिहणे ही मनोजची खासीयत आहे. मनोजची अननोन बातमी तरुण भारतमध्ये आली की सर्व यंत्रणा खडबडून जागी होती. आँफिसचे फोन खणाणू लागतात आणि चर्चा सुरु होते ती बातमी कुणाची? मनोजची अननोन बातमी कन्फर्म असणार हे माहित असल्याने काही वेळाने ती बातमी कुणाची याचा उलघडा होत जातो. पत्रकारितेबरोबर मनोजला क्रिकेट फार आवडतो. क्रिकेट खेळणे, पाहणे हा मनोजचा छंद आहे. मनोज हा उत्तम खवय्या आहे. एखाद्या हाँटेलमध्ये कुठला पदार्थ फेमस आहे हू मनोजला अचूक माहित असते. मनोजचा बहतांश वेळ हा पत्रकारितेत जातो. उरलेल्या वेळेत कुटुंब, मित्रपरिवाराला तो वेळ देतो. आपण आनंदी रहाणे आणि दुसऱ्याला आनंदी ठेवणे हे मनोजच्या जीवनाचे सुत्र आहे. या सुत्राप्रमाणेच तो जीवनाची मार्गक्रमणा करत आहे. मनोजने पत्रकारितेत नवनवीन माईलस्टोन गाठावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे. मनोजला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा