मुख्य सामग्रीवर वगळा

बार्टीचा समतादूत प्रकल्प


 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे अंतर्गत महाराष्ट्रात २०१५ पासून समतादूत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील तालुक्यात समतादूत कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे हे समतादूत महाराष्ट्रात समता प्रबोधनाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. समतादूतांच्या समताप्रबोधनामुळे राज्यात समतेचा विचार गावापासून महानगरापर्यंत पोहचत आहे.  भारतीय संविधानातील स्वांतत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही मूल्ये प्रबोधनाच्या माध्यमातून शाळा, म हाविद्यालये, गाव, वाड्या, वस्त्या, शहरे, महानगरे यांमधील नागरिकांपर्यंत पोहचविणे हा समातादूत प्रकल्पाचा मुख्य उद्देश  आहे. त्याचबरोबर भारतातील थोर संत, महापुरुष, समाजसुधारक यांचे विचार सर्व समाजघटकापर्यंत पोहचवणे हा देखील प्रकल्पाचा उद्देश आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 या कायद्याची माहिती देणे, समाजातील जातीय दुर्भावना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे, बार्टीने नेमून दिलेली सर्वेक्षणाची कामे करणे समतादूत प्रकल्पाचा हेतू आहे. समतादूत प्रकल्पाअंतर्गत तालुक्यात समतादूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. समतादूत शाळा, महाविद्यालय, वाड्या, वस्त्या, शहर, महानगर येथे समताप्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करतात व तेथील उपस्थित नागरिक व ग्रामस्थांना समताप्रबोधन करतात. समतादूतांनी गेल्या पाच वर्षात वैशिष्ट्यपूर्ण समताप्रबोधनाचे कार्य केले आहे. समतादूत प्रकल्पाअंतर्गत राज्यात समतारथ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या समतारथात राज्यातील सर्व समतादूत सहभागी झाली होते. समतारथातून पथनाट्य, प्रबोधन गीते आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, वाड्या, वस्त्या येथे समतादूतांनी समतारथाच्या माध्यमातून समताप्रबोधन केले. समतारथाच्या उपक्रमाला राज्यात उदंड प्रतिसाद मिळाला. माहिती अधिकार कायद्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी समतादूत प्रकल्पाअंतर्गत  राज्यात माहिती अधिकार कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. समतादूतांनी या कार्यशाळेचे आयोजन करुन माहिती अधिकाराची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारतीय संविधानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी संविधान बांधिलकी महोत्सव, संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमा अंतर्गत संविधान प्रास्ताविकेचे वाचन व त्याची प्रत शाळा, महाविद्यालयात प्रदान करण्यात येते. शाळा, महाविद्यालये येथे निबंध, वक्तृत्व स्पर्धा, चालता बोलता स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या उपक्रमालाही दरवर्षी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. समता सप्ताहानिमित्त समतादूतांमार्फत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. लोकराज्य मासिकाचे वितरण शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना करण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्व नागरिकांना व विद्यार्थी वर्गाला समजावे यासाठी समतादूतांमार्फत वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्यात आली. मोहिमेनुसार समतादूतांनी राज्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, तहसील कार्यालये, स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचे महत्व नागरिकांना पटवून दिले. वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. हा विचार समोर ठेवून समतादूत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीना भारतीय संविधान व समतेवर आधारित विविध समाज सुधारकांची पुस्तके समतादूतांमार्फत वितरण करण्यात आली आहेत. समतादूत प्रकल्पाअंतर्गत संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबविण्यात आला, या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमध्ये संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबविण्यात आला. एक महिनाभर गावात संविधानाबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गावात संविधान वाचन, आरोग्य शिबिर, शासकीय योजनांची माहिती, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिम, हस्ताक्षर स्पर्धा, अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ माहिती अशा विविध उपक्रमांचे गावात आयोजन करण्यात आले. या उपक्रमांबरोबर बार्टीने नेमूण दिलेली कामे समतादूत असतात. मराठी/इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे आँनलाईन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. समतादूत दुर्बल व वंचित घटकांच्या पाल्यांच्या मुलांचे आँनलाईन फाँर्म दरवर्षी मोफत भरुन देतात. समतादूतांच्या या उपक्रमामुळे राज्यात दरवर्षी असंख्य दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. स्वाधार योजनेबाबत जन जागृती व फाँर्म भरण्यातही समतादूतांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या उपक्रमांबरोबरच समतादूत बार्टीने नेमून दिलेले सर्वेक्षण करतात. अनुसूचित जातीतील विधवा सर्वे, कलाकार सर्वे, गावातील अनूसूचित जाती लोकसंख्या सर्वे आदि सर्वेंमध्ये समतादूतांनी मोलाची भूमिका बजावली आहे. कोरोना कालावधीत समतादूतांन आँनफिल्ड काम करणे अतिशय कठीण होते. परंतु या कालावधीतही समतादूतांनी समताप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे. फेसबुक लाईव्ह, झूम अँप याद्वारे समतादूत गेले सहा महिने समताप्रबोधनाचे कार्यक्रम घेत आहेत. थोर महापुरुष यांच्याविचाराचे प्रबोधनपर कार्यक्रम तसेच लोकशाहिर  अण्णाभाऊ साठे जयंती, कर्मवीर भाऊराव पाटील जयंती, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती आदि जयंती कार्यक्रम आँनलाईन पद्धतीने घेण्यात आले. जयंतीनिमित्त तज्ज्ञ व्याख्यात्यांमार्फत आँनलाईन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. कोरोनामुळे समतादूतांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने सर्व बैठकांचे आँनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. कोरोना कालावधीत समतादूतांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेली पाच वर्षे सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील समतादूत अविरतणे समताप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. "हाती शस्त्र न घेता बुद्ध राज्य करी जगावर कारण प्रचार प्रभावशाली" हा उक्तीप्रमाणे समतादूत राज्यात समता प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. समतादूतांच्या या कार्याचे राज्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. स्वातंत्र्यानंतरही आजही देशात जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे देशातील वातावरण काही काळ बिघडते. अशा परिस्थितीत समतादूतांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. समतादूतांच्या समताप्रबोधनामुळे देशातील नागरिकांची वैचारिक बैठक तयार होणार आहे. स्वांतत्र्य, समता, बंधुत्व हि मुल्ये देशातील नागरिकांपर्यंत पोहोचली तर देशात सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होणार आहे. समतादूत प्रकल्प हा सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीने देशातील इतर राज्यात समतादूत प्रकल्प राबविल्यास देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्यात विस्तारलेला समतादूत प्रकल्प संपूर्ण देशभरात राबवला जावा तरच प्रत्येक नागरिकाला भारतीयत्वाची जाणीव होईल.

                               एस. एस. कासले, मालवण जि. सिंधुदुर्ग.

   





















             समतादूत प्रकल्पातील समतादूतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची छायाचित्रे

टिप्पण्या

  1. खुपच सुंदर....समतादूत बार्टी चा अविभाज्य घटक आहे..... समतादूत यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे.... हा आमचा हक्क आहे. छान माहिती दिली.

    उत्तर द्याहटवा
  2. सध्या समाजामधे जातीवाद, हिंसा, बलात्कार, स्त्री-पुरुष असमानता, रीझर्वेशन अशा अनेक घटना घडत आहेत तोपर्यंत तरी समतादूत प्रकल्पाची गरज आहे...! शासानाने या प्रकल्पाला चालना दिली पाहिजे व पुर्ण भारतभर हा प्रकल्प राबविला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.