मुख्य सामग्रीवर वगळा

@30 स्वप्नांचा पाठलाग.............

                                                 @30 स्वप्नांचा पाठलाग.............

माझ्या आयुष्याची तीस वर्षे आज मी पूर्ण केली. तीस वर्षात पत्रकार, शिक्षक, समतादूत, कार्यक्रम आयोजक या भूमिका मी निभावल्या. बाकीच्यांना ही करीअर वाटत असतील पण माझ्या दृष्टीने या भूमिका आहेत. कारण नाटक, एकांकिकेत जसा एखादा अभिनेता आपली भूमिका अगोदरच्या भूमिकेप्रमाणे प्रभावी व्हावी यासाठी प्रयत्न करतो तसच करीअरच्या बाबतीत आहे. गेली तीस वर्षे माझा स्वप्नांचा पाठलाग सुरु आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय, मित्र परिवार, परिवर्तनवादी समाजसुधारकांचे विचार यांचा पाठिंबा मला सातत्याने मिळाला. तीस वर्षाच्या कालावधीत काही स्वप्ने पूर्ण झाली आहेत तर अनेक स्वप्ने अपूर्ण आहेत. बार्टीत मला खऱ्या अर्थाने बुद्धाची ओळख झाली. बुद्ध हा देवाचे अस्तित्व मानत नाही. मनुष्याचे जीवन दु:खाने भरलेलेले आहे. या दु:खावर मार्ग स्वतः च काढला पाहिजे असे बुद्धाचे तत्वज्ञान सांगते. याच तत्वज्ञानाप्रमाणेच मी माझ्या जीवनाची मार्गक्रमणा केली आहे. सुखात सर्वच आपले सोबती असतात पण दु:खात बुद्धाची शिकवणच आपल्या सोबत असते असे मला वाटते. बुद्धाच्या जीवनाचे मला सातत्याने कुतुहल वाटते. बुद्धाचे बहुतांश जीवन निसर्गात व्यतीत झाले. बुद्धाचा जन्म आणि महापरिनिर्वाणही निसर्गाच्या सानिध्यात झाले. माणूस दु:खमुक्त व्हावा यासाठी भगव चिवर परिधान करुन बुद्ध आपल्या भिक्कूंसमवेत भ्रमंती करीत असत. गृहत्यागानंतर बुद्ध अतिशय साधे जीवन जगले. असे जीवन कुणी अपवादानेच जगला असेल. बुद्धाने ज्या ठिकाणी भ्रमंती केली त्या ठिकाणी मला भेट द्यायची आहे. ते प्रत्येक ठिकाण पाहायच आहे ज्या ठिकाणी बुद्धाने दु:खमुक्त होण्याचा मार्ग सांगितला. माझ्या अपूर्ण स्वप्नांपैकी हे एक महत्वपूर्ण स्वप्न आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर ( स्वातंत्र्य, समता, बंधुत्व निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती) माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. या सर्वांनी शिक्षण या घटकाला महत्वपूर्ण मानले. शिक्षण व परिवर्तनवादी विचार प्रत्येकापर्यंत पोहचावे यासाठी माझा प्रयत्न असतात. हे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवणे हे माझे स्वप्न आहे. आम्ही ज्या पत्रकारिता क्षेत्रात वावरतो ते क्षेत्र नेहमी स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करते. त्यामुळे स्वतः ची वैयक्तिक अशी फारशी स्वप्ने नसतात. एखाद्या बातमीतून एखादी समस्या मांडली, त्या समस्येला न्याय मिळाला हेच आमचे स्वप्न असते जे सत्यात उतरलेले आम्ही पाहतो. संघर्ष हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला संघर्षमय जीवन जगायला आवडत. जीवनाशी संघर्ष करताना मला सातत्याने सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रपरिवार, मार्गदर्शक यांचे मनापासून आभार. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी, सोशल मिडीयावरुन शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पुनश्च आभार! तुमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा मला माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायक आहेत. लवकरच नवीन बातमी, नवीन ब्लाँगसह भेटू.

                                                     संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.