लाँकडाऊन कालावधीत बाजारात भरपूर प्रमाणात आंबाडे आले होते. मी उत्सुकता म्हणून आंबाड्यांची खरेदी केली. एक शेर पन्नास रुपये प्रमाणे मला बाजारात आंबाडे उपलब्ध झाले. घरी आणल्यावर आईने आंबाडे खारात घातले. साधारण पंधरा दिवसानंतर मी त्यातल्या एका आंबाड्याचा आस्वाद घेतला. अप्रतिम, स्वादपूर्ण असा आंबाडा होता. त्यानंतर मी आणखी दोन वेळा आंबाडे खरेदी करुन आणले आणि खारात घातले. आंबाडा या फळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर शोधमोहीम राबवली. त्यातून मला खूपच इंटरेस्टिंग माहिती उपलब्ध झाली. याच माहितीच्या अनुशंगाने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आंबाड्याचे शास्त्रीय नाव Spondias pinnata ( स्पाँडियस पिंनाटा) असे संबोधले जाते. अंबाडा हा कँश्यू या प्रवर्गात मोडतो. ग्रीक भाषेत अंबाड्याला स्पाँडियस असे संबोधतात. जगात आंबाडा हा वाईल्ड मँगो किंवा रानटी आंबा म्हणून ओळखला जातो. जगात भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशीया, थायलंड या देशात अंबाडा आढळतो. भारतात कर्नाटक व कोकण या भागात अंबाडा आढळतो. अंबाड्याच्या झाडाची पाने रामफळाच्या पानासारखी असतात. यालाही आंब्याप्रमाणे मोहोर येतो. संस्कृतमध्ये अंबाड्याला अम्रातक म्हटले जाते. गुजरातीमध्ये जंगली आंबो तर हिंदी, आसामी, बंगाली भाषेत त्याला अंबाडाच म्हटले जाते. आंबाडा हे फळ औषधोपयोगी आहे. आम्लपित्त व घोणसाच्या विषावर औषध म्हणून गुणकारी आहे. याशिवाय आंबाड्याचे असंख्य उपयोग आहेत. मी सर्वच उपयोग येथे सांगत नाही. तुम्हीही अंबाड्याचे उपयोग शोधून काढा!
संग्राम कासले, मालवण ( संदर्भ - इंटरनेट)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा