मुख्य सामग्रीवर वगळा

ब्रँव्हो कमलेश.....


 काही दिवसापूर्वी ओरोस येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश सोनावणे या मित्राची फेसबुकवर एक पोस्ट आली. घरपण द्या माझ्या घरा या अल्बममध्ये कमलेशने अभिनय केल्याची ती पोस्ट होती. त्या पोस्टखालीच कमलेशने लवकरच सरप्राईज असे लिहिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर कमलेशने मला गणरायाची स्वारी या अल्बमची युट्यबची लिंक शेअर केली. त्या व्हिडीओत कमलेश अफलातून नृत्य सादर करताना दिसला. क्षणभर मला प्रश्न पडला की कमलेश नक्की काय करतो? कमलेशचे अभिनंदन करण्यासाठी मी कमलेशला फोन केला. त्यावेळी कमलेशसोबत भरभरून बोललो. फोनवर बोलताना कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलु उलघडत गेले. कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलु सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच. कमलेश व निलेश या दोघेही भावांचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील त्यावेळी मालवण पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बालवाडी ते सातवीपर्यंत कमलेश व निलेश भंडारी हायस्कूला होते. पाचवीत असताना आम्ही जिस देश मै गंगा रहता है या गाण्यावर नृत्य केले होते. त्यामध्ये कमलेश व निलेशने सुंदर नृत्य केले होते. दोघेही शालेय अभ्यासात हुशार होते. परंतु सातवीनंतर दोघेही वेंगुर्ला येथे गेले. त्यामुळे दोघांशी असणारा माझा संपर्क तुटला. त्यानंतर पत्रकारितेच्या निमित्ताने कमलेश व निलेशची सातत्याने भेट व्हायची. सध्या कमलेश व निलेश हे दोघेही पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.  कमलेशने सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला हायस्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर 11 वी ते एसवाय बीएस्सी पर्यंतचे शिक्षण बॅ. खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे पूर्ण केले. कॉलेजचे लास्ट इयर त्याने सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर 2011 च्या पोलीस भरतीत कमलेशची पोलीस दलात निवड झाली. 2011 ते 2013 या 25 महिन्यांच्या कालावधीत कमलेशने पोलीस दलातील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कमलेशने 2015 मध्ये सहा महिनांच्या कालावधीत कमांडो कोर्स व ऑल इंडिया कमांडो चॅम्पियन हे दोन्ही खडतर प्रशिक्षणे पूर्ण केली. 2016 ते 2019 या कालावधीत कमलेशने क्रिडा संकुल ओरोस येथे गरीब व होतकरू विद्यार्थांना मोफत पोलीस भरतीचे प्रशिक्षण दिले. कमलेशच्या मार्गदर्शनाखाली 24 विद्यार्थी पोलीस भरतीत उत्तीर्ण झाले. 2018 पासून कमलेश ओरोस येथे फॉरेन्सिक डिर्पामेंटमध्ये कार्यरत आहे. कमलेशला सर्व प्रकारच्या खेळांची आवड आहे. तो हॉकी, हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल हे खेळ खेळतो. त्याचप्रमाणे त्याला ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हींग, कुकींग, फोटोग्राफी, योगा, पर्सनल ट्रेनिंग, नृत्य, नेचर फोटोग्राफी, बाईक चालविणे, गाणे ऐकणे, गाणे सादर करणे, अभिनय करणे, चित्रपट पाहणे, पेंटींग आदि छंद आहेत. हे सर्व छंद जोपासताना तो मनापासून जोपासतो. आगामी काळात कमलेशला युट्युब चँनल सुरु करायचे आहे. या चँनलच्या माध्यमातून कमलेश तरुणांना पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणार आहे. त्याच्या पेजबुक पेजवर एक सुंदर वाक्य आहे. आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायच असत. मला वाटत कमलेश आपल्या जीवनात मित्रांच्या टोळ्या घेऊन जगतो. म्हणूनच तो मला कधीही तणावात जाणवला नाही. कमलेश जेव्हा भेटतो तेव्हा तो फ्रेश असतो. प्रत्येकाच्या चेऱ्यायावर आनंद आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच कमलेशला ब्रँव्हो म्हणावेसेचे वाटते. मला वाटत तुम्हाला प्रत्येकाला कमलेशला भेटायला हवे तरच तुम्हाला त्यातला ब्रँव्होपणा जाणवेल. कमलेशच्या नवीन अल्बची मी युट्यूब लिंक शेअर करीत आहे. त्यामध्ये तुम्हाला कमलेशचा नृत्य व अभिनय पाहता येईल. त्याचा नृत्यअविष्कार अवश्य पहा व शेअर करा. https://youtu.be/dKrzubOjA0E

                 संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.