कोरोना कालावधीतील आठवडा बाजार............ कोरोना कालावधीत बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्यापैकी एक म्हणजे आठवडा बाजार करणे. मालवणचा आठवडा बाजार दर सोमवारी भरतो. मालवणचा आठवडा बाजार (कोरोना आजारापूर्वी) हा मालवण बाजारपेठेपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत भरलेला असायचा. त्यामुळे एवढा बाजार फिरणे, त्यातील आवश्यक त्या गोष्टी खरेदी करणे त्यानंतर बाजार पिशव्यांमध्ये भरुन बाजारातून बाहेर येणे हे कठीण काम असायचे. परंतु कोरोना कालावधीत बाजार करणे खूप सोपे वाटू लागले आहे. कारण आता किनाऱ्यावर फारसा बाजार भरत नाही. जो बाजार भरतो तो बाजारपेठेत. सध्या बाजारपेठेची सुरुवात स्थानिक भाजी विक्रेत्यांपासुन होते. बाजारपेठेतील सर्वच भाजी व फळविक्रेते चेहऱ्यावर मास्क लावून व सोशल डिस्टसिंग पाळत वस्तंची विक्री करताना दिसतात. ग्राहकही सोशल डिस्टसिंगचे भान पाळून वस्तूंची खरेदी करताना दिसत होते.लाल भाजी, मुळा, चवळी पाला, भोपळा, वाली, भेंडी तसेच अन्य भाज्या विक्रीस होत्या. सध्या बाजारात सर्वात महाग वस्तू भेटते ती लिंबू आणि कोथिंबीर. बाकीच्या भाज्या माफक किमतीत उपलब्ध होतात. घाटमाथ्यावरील भाज्या सध्या अभावानेच उपलब्ध होतात. बाजारपेठेतील संपला की थोड्या अंतरावर मासळी मार्केटला सुरुवात होते. मासळी बाजारात मासळी उपलब्ध होते. पण त्याबरोबरच सुकी मासळीही विक्रीसाठी उपलब्ध असते. मात्र कोरोनामुळे तुडूंब भरणारा आठवडा बाजार आता रिता वाटतो. लवकरच कोरोनाचे संकट टळेल अशी अपेक्षा प्रत्येक मालवणवासीय व्यक्त करत असेल जेणेकरून मालवणवासीयांचा मनसोक्त बाजार करता येईल. संग्राम कासले, मालवण
Translation.......
Weekly market during the Corona period ............
A lot was learned during the Corona period. One of them is weekly shopping. Malvan's weekly market fills up every Monday. Malvan's weekly market (before corona disease) used to be full from Malvan market to the beach. So it used to be a difficult task to walk around the market, buy the essentials and then pack the bags and come out of the market. But the Corona period is starting to feel a lot easier to market. Because there is not much market on the coast now. The one who fills the market is in the market. Currently the market starts with local vegetable sellers. All the vegetable and fruit sellers in the market are seen selling items wearing face masks and observing social dusting. Consumers were also seen buying items with a sense of social disturbance. Currently, the most expensive items on the market are lemon and cilantro. The rest of the vegetables are available at reasonable prices. other state vegetables are currently in short supply. The fish market starts at a short distance from the end of the market. Fish is available in the fish market. But dried fish is also available for sale. But the corona-filled weekly market now feels empty. Every Malvan resident hopes that the Corona crisis will be over soon so that the people of Malvan can have a market of their choice.
Sangram Kasle, Malvan
होय...कोरोनामुळे बरच काही चित्र पालटलं आहे .लवकरच सर्व स्थिर होईल अशी अपेक्षा आहे....
उत्तर द्याहटवा