शनिवार.........
शनिवार शाळेत असल्यापासूनच माझा आवडता वार. दूरदर्शनवर शक्तीमान सुरु झाल्यापासून शनिवार माझा आवडता वार झाला. शनिवारी शाळा सुटल्यावर 11.30 वाजता शक्तीमान पाहण्यासाठी मी धावत घरी जात असे. शक्तीमान पाहून झाल्यावर संध्याकाळी क्रिकेट खेळणे त्यानंतर अभ्यास असा दिनक्रम झाला होता. पुढे शक्तीमान सिरीयल बंद झाल्यावर शनिवारी शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळणे हा माझा आणि माझ्या मित्रांचा आवडता छंद बनला. भंडारी हायस्कूलच्या ग्राऊंडवर शनिवारी सकाळी 7.30 ला शाळा भरण्याअगोदर आम्ही ग्राऊंडवर पोहचायचो. तेवढ्यात वेळेत आमचा क्रिकेटचा डाव व्हायचा. त्यानंतर शनिवारच्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मनसोक्त खेळायचो. अकरावी बारावीत अभ्यासामुळे शनिवारचा आनंद लुटता आला नाही. त्यानंतर पत्रकारितेमुळे फारसा शनिवारीचा वेळ मिळत नव्हता. बीएडच्या बीझी शेड्यूलमुळे शनिवार अनुभवता आला नाही. 2012 मध्ये सावंतवाडीला हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना मला तीन वर्षे पगार नव्हता. त्यामुळे अर्थाजनासाठी मालवण येथे शनिवारी क्लास सुरु करणे भाग पडले. त्यामुळे शनिवारचा वेळ मुलांसोबत जायचा. 2016 मध्ये मी सामाजिक न्याय विभागाच्या प्रकल्पासाठी रायगडमध्ये काम करीत होतो. त्यावेळी शनिवारी दिवा गाडीने मी कणकवलीला यायचो. संपूर्ण शनिवार दिवा गाडीच्या प्रवासात जायचा. दै. तरुण भारतमध्ये रुजू झाल्यापासून दर शनिवारी कणकवली येथे सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून जायचो. पण त्यानंतर घराच्या कामामुळे शनिवारी मालवणात उपस्थित रहावे लागायचे. सध्या लाँकडाऊनमुळे शनिवारी क्राईम पेट्रोल आणि सिनेमा पाहण्याचा आनंद लुटतोय.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा