मुख्य सामग्रीवर वगळा

My Friend

भाल्या.......     
 भाल्या हा माझा बीएडचा मित्र. मुळात भाल्या आणि माझी मैत्री होईल असे मला कधीही वाटले नव्हते. पण बीएडला पप्पूची ओळख झाली आणि त्यानंतर भाल्या मला भेटला. भाल्याचे नाव भालचंद्र ठाकूर पण बहुतांश मित्र त्याला भाल्याच म्हणतात. भाल्या हे नामकरण पप्पूनेच केले आहे.( असे पप्पू दरवेळी आम्हाला सांगतो.) बीएड होऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला असेल पण तरीही बीएड लक्षात राहतो ते भाल्या, पप्पू आणि काही मित्र-मैत्रिणीमुळे. बीएड नंतर भाल्या माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झाला. बीएडनंतर नोकरीसाठी करावी लागणारी वणवण, मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे पगाराअभावी आलेले नैराश्यक्षया कालावधीत माझे कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी त्याचबरोबर भाल्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. भाल्यानेच मला खडबडून जागे केले आणि मळेवाड येथील शिक्षकाची नोकरी सोडायला लावली. आज त्याचा तो निर्णय मला सार्थ वाटतोय. बार्टीच्या इंटरव्ह्यूच्यावेळी भाल्या दिवसभर माझ्यासोबत पुण्याला थांबून होता हे मी कधीही विसरणार नाही.     भाल्या नेहमी म्हणतो शिक्षकापेक्षा तु पत्रकारीतेच्या फिल्डमध्ये मला कम्फर्टेबल वाटतो. ईथेही भाल्याचा डिसीजन चुकला नाही. मी सध्या तरुण भारत मध्ये काम करत आहे. बरेच दिवस माझी बातमी आली नाही की भाल्या आवर्जून फोन करतो. अरे नवीन काय लिहलास नाय हल्ली!   कुणालाही आश्चर्य वाटेल पण बीएडनंतर मी आणि भाल्या नेहमी फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. (सध्या भाल्याचे लग्न झाल्यामुळे आठवड्यातून एक दोनदा फोन होतो). भाल्याची खरी आवड शिक्षकी पेशा होती.परंतु गेल्या दहा पंधरा वर्षातील शिक्षक क्षेत्रातील अस्थैर्य, नोकरीसाठी करावी लागणारी वणवण यामुळे त्यांने स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला.आज भाल्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात ऑफिसर म्हणून काम करत आहे. भाल्याचे स्पिरिट माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलेला आहे.गेल्या आठ वर्षात भाल्या मला सतत जागा करत राहिला. त्यामुळेच मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकलो.

                                                                                                    संग्राम कासले, मालवण          

टिप्पण्या

  1. भाल्या सारखे मित्र सर्वांना मिळावेत.भाल्याचे पत्रकारितेच्या विषयीचे मार्गदर्शन मलाही अचूक वाटते.भालचंद्र नावाचे भाल्या म्हणून नामांतर करणाऱ्या संग्राम दादा तुझ्या मित्राचे विशेष कौतुक.
    Waiting for next blog Sangram Da

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.