ऐसा है हमारा टायटस.........
आज सकाळी एका बातमीच्या निमित्ताने दांडी समुद्रावर गेलो होतो. वाटेत येताना टायटस भेटला. त्याने दूरूनच मला थांबण्याचा इशारा केला. मी गाडी थांबवली. टायटस म्हणाला, मला मुलगी झाली. मी त्याचे अभिनंदन केले. पुढे जाऊन तो म्हणाला 'तु काय आपल्या दहावीच्या ग्रुपवर टाक'. टायटसला काय म्हणायच ते माझ्या लक्षात आले. मी घरी गेल्यावर टायटस व रुचिरा यांना मुलगी झाल्याची पोस्ट ग्रुपवर टाकली. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडेल की कैसा है ये टायटस! टायटस आणि माझी मैत्री बालवाडी पासूनची आहे. बालवाडीत मी आणि टायटस वाघ बाईंकडे एकत्र असायचो. त्यानंतर टायटस रोझरी इथल्या शाळेत गेला. तरीही तो अधूनमधून भेटायचा. सातवीत टायटस भंडारी हायस्कूलमध्ये आमच्या सोबतीला आला. टायटस हा एक अजब रसायन आहे. कोणत्याही परिस्थितीत विनोद करुन वातावरणात हसत खेळत ठेवणे हा त्याचा स्थायिभाव. परंतु कधीकधी त्याचे विनोद भलतेच गंभीर वातावरण निर्माण करायचे. टायटसचा इंग्रजी व्याकरणाचा विशेष अभ्यास आहे. त्याचे क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. तसेच बास्केटबॉल, व्हाँलीबाँल हे खेळही विशेष आवडतात.आम्ही दहावीत असताना बोर्डींग ग्राऊंडवर क्रिकेट मँच खेळताना त्याला खूप उशिरा बँटींग करायची संधी मिळाली.तरीही टायटसने लागोपाठ दोन चेंडुत दोन सुंदर कव्हर ड्राईव्ह लगावलेले आम्ही सर्वांनी पाहिले. टायटस हा उत्तम विनोदी अभिनेता आहे. हे त्याच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रीणींना स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जाणवले असेल. टायटसचा मित्र परिवार प्रचंड मोठा आहे. तो जिथे जातो तेथे लोकांची मने जिंकतो आणि मित्र परिवार वाढवतो. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. गोव्यात एका जखमी पर्यटकांना रक्ताची गरज होती. ही बातमी गोव्यात असलेल्या टायटसला समजली. टायटसने आपल्या मित्राला सोबत घेऊन हाँस्पिटल गाठले आणि त्या पर्यटकांना रक्तदान करुन त्यांचा प्राण वाचवले. टायटस गोव्यात हाँटेलवर मँनेजर म्हणून कार्यरत आहे. सध्या लाँकडाऊमुळे तो मालवणात आहे. टायटस हा स्वच्छ मनाचा आहे. म्हणूनच तो आमच्या सर्व मित्रांचा लाडका आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्याला प्रेमाने टायट्या हे नाव ठेवले आहे. आता आमचा टायट्या बापमाणूस झाला आहे. टायटस आणि रुचिरा यांना कन्यारत्न झाले आहे. टायटसच्या परिवारात आज आनंदाचे वातावरण आहे. दोघांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

छान लिहिलं आपल्या अकरावी बारावीच्या काही आठवणी लीहिशील ही अपेक्षा
उत्तर द्याहटवाअवश्य रवी
हटवाखरंच छान
उत्तर द्याहटवा