भांडीविक्रेत्याला मदतीचा हात.......
लाँकडाऊन कालावधी आम्हा पत्रकारांकडे मदतीच्या आवाहनासाठी बातम्या येत होत्या. आमचे सहकारी प्रतिनिधी मनोज चव्हाण हे बेळगाव येथील भांडी विक्रेते मंजुनाथ शिवाजी गोंधळी या भांडी विक्रेत्याला मदत हवी आहे अशा आशयाची बातमी करणार होते. आम्ही पत्रकार अशा प्रकारच्या बातम्यांद्वारे गरजू व्यक्तीला मदतीचे आवाहन करीत असतो. पण आमच्या दै. तरुण भारत मालवण कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी यावेळी भांडीविक्रेते गोंधळी यांना स्वतः हून मदत करायची ठरवली. त्यानुसार आमचे सहकारी बंटी केनवडेकर, मनोज चव्हाण, अक्षय मयेकर, उमेश शिरोडकर आणि मी अशा सर्वांनी मिळून गोंधळी आणि त्यांच्या कुटुंबियांना महिन्याभरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्याचे ठरवले. गोंधळी यांना आँफिसमध्ये बोलावून सर्व वस्तू देण्यात आल्या. यानंतर मंजुनाथ गोंधळी यांना मदत हवी असल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर त्यांना काही व्यक्तींनी मदतही केली. लाँकडाऊन कालावधीत सर्वांची आर्थिक स्थिती बेताची आहे. गोंधळी हे एमएटीवरुन भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. पण लाँकडाऊन कालावधीत त्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गोंधळी यांची आर्थिक स्थिती फारच खालावलेली वाटली. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांना मदत केली. माझी मदत करण्याची ही पहिलीच वेळ त्यामुळे ही आठवण कायम स्मरणात राहिल.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा