मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतला कबीर......


आठवणीतला कबीर...... 
साधारण चार वर्षापूर्वी बार्टीच्या समतादूत प्रकल्पाची कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत एक तरुण डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत सादर होता. मेरे संविधानके शिल्पकार तेरा जलवा यहाँ पर अभी है असे त्या गीताचे बोल होते. त्या गीताला समतादूतांकडून वन्स मोआर मिळत होता. मी माझा मित्र दत्ता गायकवाडला विचारल, दत्ता हा परिवर्तनवादी चळवळीतील आहे का? दत्ता म्हणाला नाही रे कबीर अत्तार आहे त्याचे नाव. तो मुस्लिम आहे पण परिवर्तनवादी चळवळीतली गाणी म्हणतो. दत्ताने कबीरची जी ओळख करुन दिली त्या ओळखीतूनच कबीर काय आहे हे समजला आणि कायम आठवणींच्या कप्यात राहिला.त्यानंतर माझी आणि कबीरची ओळख झाली. कबीरच्या कविता माझ्या समतानायक या विशेषंकातून प्रसिद्ध केल्या होत्या. कबीर सध्या समतादूत प्रकल्पात नाही. तो आपले दुकान सांभाळून राज्यात प्रवचन, किर्तनसेवा करतो. छत्रपती शिवाजी महारांजावरील त्याची प्रवचने अभ्यासपूर्ण असतात. शिवा काशिदवरील त्याचे किर्तन मला फार आवडते. राज्यात कबीरने बऱ्याच ठिकाणी काही किर्तन केली आहेत. त्याची अनेक किर्तने युट्यूबवर उपलब्ध आहेत. रमजानच्या निमित्ताने मी कबीरला फोन केला होता. त्यावेळी कबीरकडून रमजान ईद व बकरी ईदची माहिती घेतली होती. सोप्या भाषेत कबीरकडून माहिती मिळाली. कबीरचा स्वांतत्र्य, समता, बंधुता या मुल्यांवर दृढ विश्वास आहे. त्याच्या गीतामधुन मुल्यांवरील विश्वास दिसून येतो. मला वाटत असे अनेक कबीर या देशात असतील जे स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जोपासना करुन जनतेचे प्रबोधन करण्याचे कार्य करतात. मला हा कबीर समताप्रबोधनाच्या निमित्ताने मिळाला. तुम्हालाही समाजात असे अनेक कबीर सापडतील. त्यांचा नक्की शोध घ्या व त्यांचे कार्य समाजासमोर आणा.
                                                                                                 संग्राम कासले, मालवण
     Translation                                                  
                                                             
                                                                The Kabir 
    About four years ago, a workshop on Barti's Samatadoot project was organized in Pune.  A young man performed in  Babasaheb Ambedkar's song in workshop. The lyricist of that song were mere savidhanake shilpkar tera jalava yaha par abhi hai.  That song was getting Once More from Samataduta.  I asked my friend Datta Gaikwad, is he from the revolutionary movement?  Datta said no, his name is Kabir Attar.  He is a Muslim but sings songs of the revolutionary movement.  From the introduction of Kabir by Datta, I understood what Kabir was and remained in the cup of memories forever. Then I met Kabir.  Kabir's poems were published in this special suplement of Samatanayak.  Kabir is not currently in the Samatadoot project.  He manages his shop and preaches in the state.  His discourses on Chhatrapati Shivaji Maharanja are scholarly.  I love his kirtan on Shiva Kashid.  Kabir has performed some kirtans in many places in the state.  Many of his songs are available on YouTube.  I called Kabir on the occasion of Ramadan.  At that time, Kabir gave information about Ramadan Eid and Bakari  Eid.  Information was received from Kabir is in simple language.  Kabir is a firm believer in the values ​​of freedom, equality and brotherhood.  His song shows faith in values.  I think there will be many Kabirs in this country who work to enlighten the people by upholding the values ​​of freedom, equality and brotherhood.  I got this Kabir on the occasion of Samata Prabodhan.  You will also find so many Kabirs in the society.  Find them and bring their work to the attention of the society.
                                                                                            Sangram kasale, Malvan
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.