मुख्य सामग्रीवर वगळा

प्राध्यापक नागेश कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आमचे मित्र आणि प्राध्यापक नागेश कदम यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. प्राध्यापक नागेश कदम आणि माझी ओळख अकरावीत असताना निबंध लेखन स्पर्धेच्या निमित्ताने झाली होती.अकरावीत असताना मला निबंध लेखन करायचे होते. त्यावेळी कन्याशाळा येथे मी सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी प्राध्यापक नागेश कदम यांनी मला विस्तृतपणे निबंध लेखनाविषयी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्ष विविध निबंध स्पर्धांमध्ये प्राध्यापक नागेश कदम यांनी क्रमांक प्राप्त केले आहेत. यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचा देखील समावेश आहे. निबंध लेखन करत असताना तो कशा पद्धतीने करावे याचे सखोल ज्ञान प्राध्यापक नागेश कदम यांच्याकडे आहे. त्या पद्धतीने त्यांचे निबंध लेखन विस्तृत असते. एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही ते ओळखले जातात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ते सातत्याने मदत करत असतात. सातत्याने अभ्यास करावा लेखन करावे असे ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असतात. माझी पत्नी पौर्णिमा आणि माझी ओळख प्राध्यापक नागेश कदम यांच्यामुळेच होऊ शकली. प्राध्यापक नागेश कदम यांच्यामुळेच मी आणि पौर्णिमाने नवीन सहजीवनाची सुरुवात केली. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नागेश कदम आम्हाला दोघांनाही सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.