रविवारी आम्ही आमचे मुळगाव वडाचापाट या गावाला भेट दिली. मालवण पासून 17 किलोमीटर अंतरावर वडाचापाट गाव आहे. साधारणत पाऊण तासाचा प्रवास आहे. 1960 साली वडाचापाट बौद्धवाडी येथे बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न झाला होता. या धम्मदीक्षा सोहळ्यात जिल्ह्यातील धम्म बांधव सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन जिल्ह्यातील धम्म बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आंबेडकरवादी चळवळ येथील जेष्ठ कार्यकर्ते मधुसूदन डांगमोडेकर यांनी याबाबतची माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली होती. त्याचे वृत्तांकन दैनिक तरुण भारत मधून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे वडाचापाट गाव ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते.https://youtu.be/Z5FjHM-Dml0
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा