भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा बाव आणि समता उत्कर्ष मंडळ बाव मुंबई आणि ग्रामीण शाखा, माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ मे रोजी लुंबिनी बुद्ध विहार डॉ. आंबेडकर नगर बाव येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा होणार आहे.
४ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व महिलांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. ५ मे रोजी सकाळी १० वाजता पंचशील ध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ वंदना, सकाळी ११.३० वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ आणि बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, जिल्हा भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी सभापती राजन जाधव, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, पणदूर सरपंच दादा साईल, जितेंद्र सावंत आदि उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व शैलेश कदम प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष भालचंद्र कदम, सरचिटणीस वसंत कांबळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा