बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी मालवण येथील युथ बीटस फॉर क्लायमेटसच्या सदस्यानी मालवण बंदरजेटी येथे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात घोषणा दिल्या. युथ बीटस च्या सदस्यानी प्रस्ताविक प्रकल्पा विरोधातील घोषणाचे फलक झळकावून प्रकल्पाचा निषेध व्यक्त केला. युथ बीटसच्य सदस्यानी मालवण बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गवर जाणाऱ्या पर्यटकांनाही या आदोलन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यावेळी काही पर्यटकांनी प्रकल्पाच्या विरोधात घोषणा दिल्या.
या आंदोलनात मेघल डिसोजा, हार्दिक कदम, स्वाती पारकर, संजय वराडकर, दिक्षा लुडबे, दर्शन वेंगुर्लेकर, वैभवी सातार्डेकर, समृद्धी मळेकर, संजय मळेकर, ऐशवर्य मांजरेकर, महादेव तळवडेकर, अजय कांबळी, सुनील पोळ, सचीन कांबळी, सिद्धेश मांजरेकर, मनीषा पारकर, स्वप्निल गोसावी, किरण हिर्लेकर आदि सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा