मुख्य सामग्रीवर वगळा

आचरेत आजपासून मैदानी खेळांची प्रशिक्षण कार्यशाळा : अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीचे आयोजन

अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने १० मेपासून आचरा हायस्कूलच्या मैदानावर विविध मैदानी खेळांची (अथलेटिक गेम्स) कायमस्वरूपी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होत आहे. अथलेटिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी, या हेतूने अकॅडमी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे आचरा दशक्रोशीतील जास्तीत जास्त मुलांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आचरा हायस्कूलच्या मैदानावर तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही कार्यशाळा कायमस्वरूपी सुरू राहणार असून यात प्रामुख्याने धावण्याचे सर्व प्रकार, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक या खेळ प्रकारांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सिद्धेश आचरेकर (8275649254) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यशाळा मे महिना कालावधीत सकाळी 7 ते 9 या वेळेत होईल. जूनपासून सायंकाळी 4 ते 6 या वेळेत घेतली जाणार असून ओंकार धुरी हे मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. 

मुलांसह पालकांमध्ये असणारा खेळाविषयीचा न्यूनगंड दूर करण्याचा आमचा मानस आहे. शाळेतील मुलांना खेळायला पुरेसा वेळ मिळत नाही. शालेय जीवनात अभ्यासापुढे खेळाला दुय्यम स्थान दिले गेल्याने क्रीडा स्पर्धांमध्ये मुले मागे राहतात. हे चित्र बदलण्यासाठी शालेय स्पर्धासह तालुका, जिल्हा, विभाग, राज्य ते राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या दृष्टीने मुलांकडून तयारी करून घेतली जाणार आहे. यातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये स्पर्धात्मक खेळासाठी लागणारी मानसिकता, शारीरिक क्षमतेचा असलेला अभाव नक्कीच दूर होईल, असे अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धेश आचरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.