तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांती व समतेचा संदेश दिला. गौतम बुद्धांचे विचार प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यामुळे तथागत गौतम बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवूया असे प्रतिपादन वडाचापाट सरंपच सोनिया प्रभुदेसाई यांनी वडाचापाट बौद्धवाडी येथे आयोजीत संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने केले.
भारतीय बौद्ध महासभा गावशाखा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट, वडाचापाट बौद्ध विकास मंडळ मुंबई, रमाई महिला मंडळ वडाचापाट यांच्या विद्यमाने वडाचापाट बौद्धवाडी येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, कोषाध्यक्ष संजय पेंडूरकर, संस्कार विभाग सचिव नचिकेत पवार, ग्रामविकास अधिकारी अंकुश मुणगेकर, विलास वळंजू, भानुदय कासले, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अजय कासले, सचिव सतिश कासले, गाव शाखा अध्यक्ष सचिन कासले, सचिव सूरज कासले, संदिप कासले, संजय धारपवार, भगवान मोरे, यशवंत कदम आदि उपस्थित होते.
संयुक्त जयंती उत्सवानिमित्त वडाचापाट समाज मंदिर येथे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मोठा गट प्रथम- संघमित्रा पवार, द्वितीय- सिद्धार्थ पवार, तृतीय - सलोनी कासले, उत्तेजनार्थ प्राजक्ता कासले, लहान गट प्रथम- सायली पाताडे, द्वितीय- श्रावणी मांजरेकर, वक्तृत्व स्पर्धेत मोठा गट प्रथम- निकिता पाताडे, द्वितीय - सिद्धार्थ पवार, छोटा गट प्रथम- सिया पाताडे, द्वितीय- आर्या कासले यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खुल्या गटात संघमित्रा पवार हिला विशेष प्राविण्याने सन्मानित करण्यात आले. वडाचापाट समाजमंदिरला विनामूल्य जागा देणारे दिवगंत गुणाजी कासले व सुलोचना गुणाजी कासले यांच्या मुली विजया पवार व विशाखा वळंजू यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाव शाखा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट, वडाचापाट बौद्ध विकास मंडळ मुंबई, रमाई महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. सुत्रसंचालन सचिन कासले यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा