मुख्य सामग्रीवर वगळा

आचरा येथे संयुक्त जयंती उत्सव साजरा

भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौद्ध सेवसंघाचे सचिव रवींद्र पवार यांनी केले. 

आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नूतन व्यासपीठ व सभागृहाचे सरपंच प्रणया टेमकर यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विद्याधर आचरेकर, सरपंच प्रणया टेमकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर, महिला मंडळ अध्यक्षा नंदिनी आचरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण आचरेकर, लोकमान्य बँक शाखाधिकारी राजेंद्र मोर्वेकर आदी उपस्थित होते. महिला मंडळाने बुद्धस्तवन गीत सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर आचरेकर केले. रात्री स्थानिक महिला, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आली. यावेळी विश्वास आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, विनोद आचरेकर, उदय आचरेकर, प्रमोद आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, मंगेश आचरेकर, प्रसाद आचरेकर, विशाल कांबळे, तुषार आचरेकर, साहिल आचरेकर, अथर्व आचरेकर, आर्यन आचरेकर, सागर आचरेकर, राजू आचरेकर, वीर आचरेकर, आर्या आचरेकर, सानिका आचरेकर, आदिती आचरेकर, शर्वरी कांबळे, सुजल कांबळे यांच्यासह वाडीतील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांसह स्वप्नजा साटम, तुकाराम पडवळ, वसंत आचरेकर, आनंद आचरेकर, पुनाजी आचरेकर, एकनाथ आचरेकर, सुभाष आचरेकर, सिद्धार्थ आचरेकर, बाबाजी भिसळे, नंदकुमार आचरेकर यांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले. लक्ष्मण आचरेकर, सरपंच टेमकर, नंदिनी आचरेकर, मोर्वेकर यांनी मनोगते व्यक्त केली. बौद्ध धम्म हा जगण्याचा मार्ग दाखवतो. तो सर्वांनी आचरणात आणला पाहिजे, असे विद्याधर आचरेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.