मालवण दांडी किनाऱ्यावर 27 ते 30 एप्रिल या कालावधीत गाबीत महोत्सव संपन्न झाला. 30 एप्रिल रोजी रात्री आम्ही गाबीत महोत्सव येथे गेलो होतो. यावेळी गाबीत महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉलवरील चुलीवरची मटक्यातील दही मिसळ या पदार्थाचा आम्ही आस्वाद घेतला. अतिशय सुंदर पद्धतीने ही मिसळ बनवण्यात आली होती. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ बनवण्यात आली होती. यावेळी आम्ही मिसळ स्टॉलच्या व्यवस्थापक शैलजा माणगावकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला मिसळ बाबतची माहिती दिली. तुम्हाला कार्यक्रमसाठी सदरची मिसळ हवी असल्यास संपर्क - शैलजा माणगावकर 942025201, 9421106456
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा