माझा 16 एप्रिल रोजी कोळंब येथे एक्टिवा दुचाकीसह अपघात झाला होता. या अपघातात एक्टिवाचे पॅनल खरचटले होते. तसेच उजव्या साईडच्या आरशाचे नुकसान झाले होते. एक्टिवाचा इन्शुरन्स असल्यामुळे मी efco टोकियोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला एक्टिवा गाडी. होंडाच्या शोरूम सर्विसिंग सेंटर येथे नेण्यास सांगितली. मालवण होंडाचे शोरूम सर्विस सेंटर येथे दुरुस्तीची सोय नसल्याने कणकवली येथील लक्ष्मीनारायण होंडा येथे एक्टिवा दुचाकी नेण्यास सांगण्यात आले. 20 एप्रिल रोजी मी एक्टिवा दुचाकी कणकवली येथील लक्ष्मीनारायण होंडा येथे दुरुस्तीसाठी दिली. मी दहा दिवसांनी फोन केला असता दुचाकीचे पॅनल रंगवून आल्याची माहिती मला देण्यात आली. सदरची दुचाकी चार दिवसात मिळेल अशी माहिती देण्यात आली. मी चार दिवसानंतर फोन केला असता पार्ट पुन्हा मागवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मी पुन्हा चार दिवसांनी फोन केला असता आणखीन चार दिवस लागणार असल्याचे शोरूम कडून सांगण्यात आले. मी 12 मे व ते 13 मे या दिवशी फोन केला असता 14 मे रोजी संपूर्ण दुचाकी तयार करून ठेवण्यात येईल असे शोरूम करून सांगण्यात आले. 14 रोजी मी सकाळी कणकवली लक्ष्मीनारायण होंडा शोरूम सर्विसिंग सेंटर येथे गेलो असता अजून दुरुस्त नसल्याचे सांगण्यात येऊन मंगळवारी दुचाकी मिळेल असे सांगण्यात आले. आतापर्यंत 25 दिवस होऊन गेले तरी अद्याप एक्टिवा दुचाकी दुरुस्त होऊन मिळालेली नाही. अशा पद्धतीने ग्राहकांना एक प्रकारे मानसिक दृष्ट्या मनस्ताप देण्याचे काम होत आहे. अशा स्थितीत बेमुदत उपोषणा जास्त शिवाय पर्याय राहणार नाही.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा