भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखा मालवण च्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४८ वा स्मृतिदिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे संपन्न झाला.
सर्वप्रथम प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.दीप, धूप प्रज्वलित करण्यात आले.त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुका सरचिटणीस आद.प्रकाश पवार यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुका प्रचार व पर्यटन सचिव आद.संग्राम कासले यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तालुका शाखेला भेट दिली.
यावेळी जिल्हा संस्कार सचिव आद.विलास वळंजू,तालुका कोषाध्यक्ष आद.सूर्यकांत कदम,तालुका प्रचार व पर्यटन सचिव आद.संग्राम कासले, कुणकवळे गाव शाखा अध्यक्ष आद.संदीप कदम, तालुका संस्कार सचिव आद.योगेश वराडकर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा