मालवण वार्ताहर - गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास महान येतील गांगेश्वर मंदिर नदीचे मोठे वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेले झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर बांधकाम विभागाचे गावित यांनी घटनास्थळी पोहचून जेसीबीच्या सह्यायाने उर्वरित झाड रस्त्याच्या बाजूला केले. महान गावामध्ये अजूनही रस्त्याने वडाची व इतर झाडे धोकादायक बनली आहेत.तसेच प्राथमिक शाळा महान याला लागून असलेले वडाचे झाड धोकादायक स्थितीत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा