मुख्य सामग्रीवर वगळा

*2 ऑक्टोंबर रोजी कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम*


मालवण वार्ताहर - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 
    सकाळी 10:30 वाजता धम्म ध्वजारोहण, 10:45 वाजता धम्म वंदना, 11 वाजता जाहीर सभा व सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रविकांत कदम असणार आहेत तर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.  
    प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, प्राध्यापक डॉ. नंदू हेदुळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर. डांगोमोडेकर, जेष्ठ कार्यकर्ते व्ही. टी. जंगम माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम आधी उपस्थित राहणार आहेत.   
प्रमुख उपस्थिती महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, महिला तालुकाध्यक्ष नेहा काळसेकर, महिला सरचिटणीस समता डिकवलकर, जिल्हा महिला संघटक लीना तळगावकर यांची उपस्थिती असणार आहे. 
      तरी या कार्यक्रमास मालवण तालुक्यातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.