मुख्य सामग्रीवर वगळा

मालवण पत्रकार समितीच्यावतीने पत्रकार दिन साजरा

मालवण वार्ताहर


मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी केले.              

मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार वितरण मसूरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी उमेश तोरसकर हे बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, साहित्यिका वैशाली पंडित, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी उपस्थित होते. प्रारंभी तालुका अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. 


यावेळी छायाचित्रकार - पत्रकार गणेश गांवकर यांना स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार सुधीर पडेलकर यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आणि पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना बेस्ट स्टोरी अवॉर्ड (मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच यावेळी पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल पत्रकार महेश सरनाईक, मुख्याध्यापिका शुभांगी अमित खोत, पोलीस पाटील प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रम झाले. 

यावेळी तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले, मालवण तालुक्यात हजर झाल्यानंतर माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मालवण तालुक्यात काम करताना पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकांभिमुख काम करण्याचा आपला प्रयत्न राहील. मालवण तालुका प्रशासकीय दृष्ठ्या चांगला तालुका करण्याचा आपला प्रयत्न पुढील काळात असेल, असेही ते म्हणाले. गटविकास अधिकारी शाम चव्हाण म्हणाले, प्रशासनाला पत्रकारांचे चांगले सहकार्य लाभते. पत्रकार संघाकडून सन्मान होणे म्हणजे मोठा सन्मान आहे. यापुढेही प्रशासनाला चांगले सहकार्य पत्रकारांचे लाभावे, वंचित घटकाना न्याय देण्याचे काम पत्रकार करत आहेत, असेही ते म्हणाले.  


यावेळी उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. सरोज परब, राजन परब, यांनीही विचार मांडत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले. यावेळी मसूरे मंडळ अधिकारी श्री. शिंगरे, ग्रामसेवक श्री. मगम, डॉ. विश्वास साठे, शिवाजी परब, विलास मेस्त्री, पत्रकार नंदकिशोर महाजन, महेश सरनाईक, समीर म्हाडगूत, विशाल वाईरकर, मनोज चव्हाण, राजेश पारधी, कुणाल मांजरेकर, अमोल गोसावी, अर्जुन बापर्डेकर, संदीप बोडवे, आपा मालंडकर, सौगंधराज बादेकर, परेश सावंत, संग्राम कासले, नितीन गावडे, भूषण मेतर, उदय बापर्डेकर, अनिल तोंडवळकर, महेश कदम, शैलेश मसूरकर, झुंजार पेडणेकर, केशव भोगले आदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.