मुख्य सामग्रीवर वगळा

100 व्या ब्लॉग पोस्ट च्या निमित्ताने

आस्था ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन ही माझ्या ब्लॉग वरील शंभरावी पोस्ट होती. १०० व्या पोस्टचा हा प्रवास अतिशय रंजक असा आहे. कोरोना कालावधीत मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कारण कोरोना कालावधीत वेळेची उपलब्धता होती. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होण्यासाठी व काहीतरी वेगळं करावं या हेतूने मी ब्लॉग घेण्यास सुरुवात केली. माझा  पहिला ब्लॉग माझा मित्र भालचंद्र ठाकूर याच्यावर लिहिला त्यानंतर ब्लॉग लिहिण्याचा प्रवास सुरूच राहिला. या ब्लॉगमध्ये व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, संस्मरणीय घटना यांचा समावेश होता. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगमध्ये सातत्य ठेवणे शक्य झाले नाही. कधी कधी माझ्याकडून दिवसातून एक ब्लॉग घेण्याचा प्रयत्न व्हायचा तर कधी कधी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक लिहीन होऊ लागलं. परंतु आता नवीन मोबाईल घेतल्यामुळे ब्लॉगमध्ये नियमितपणा येऊ लागला आहे. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने ब्लॉग लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण ज्या वातावरणात घडतो, ज्या समाजातून घडतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे त्याची नोंद कुठेतरी असणे आवश्यक आहे. इतिहासात मागे वळून पाहताना आपण काय केले याचे विचार मंथन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने मला टोपीवाला हायस्कूल येथील टाईम कॅप्सूल म्हणजेच कालकुपीचे उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपूर्वी टोपीवाला हायस्कूलने आपल्या शाळेच्या प्रांगणात टाईम कॅप्सूल म्हणजेच कालकुपी तयार केली होती. या कालकुपीमध्ये टोपीवाला हायस्कूलशी संबंधित असंख्य गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. शंभर वर्षानंतर काल कुपी जेव्हा उघडली जाईल त्यावेळी त्या पिढीला 100 वर्षांपूर्वी इथे काय घडलं होतं याची माहिती मिळेल. त्यावेळीच्या संस्कृतीची देखील माहिती मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने ब्लॉग लिहीन हे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे त्याचे विचार स्वतंत्र असतात.हे विचार पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे लेखन. असते सध्या सोशल मीडियामुळे पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी झाले. आहे. त्यामुळे या ब्लॉगच्या निमित्ताने लिहिणे होते, वाचणे होते आणि सर्वांपर्यंत पोहोचता देखील येते. एक प्रकारे ही प्रत्येकाची डायरीच असते असे मला वाटते. त्यामुळे प्रत्येकाने ब्लॉग लिहावा असे मला वाटते. मी ब्लॉक सुरू केल्यानंतर काही महिन्यातच युट्युब सुरू केले. या youtube वर विविध विषयांची मी मांडणी केली. जे विषय मला आवडले भावले व इतरांपर्यंत पोहोचावे असे वाटले त्या विषयाची मांडणी मी youtube च्या माध्यमातून केली. एकूणच काय की आपण प्रत्येकाने लिहीत राहिले, पाहिजे बोलत राहिले पाहिजे, तरच आपल्या हातून नवनवीन चांगल्या गोष्टी घडू शकतात. ब्लॉगच्या निमित्ताने किंवा यूट्यूबच्या निमित्ताने मला जगभरातील अनेक देशांमध्ये आपलं वाचन साहित्य नेता आलं. मी ज्यावेळी ब्लॉगचा वाचक वर्ग पहिला तो वाचक वर्ग 6000 च्या पुढे गेलेला मला दिसून आला त्यामध्ये भारत, युनायटेड स्टेट, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, आयर्लंड यासारख्या देशांचा समावेश होता. म्हणजे आपण जे लिहितो ते जगभरात वाचले जाते. त्याची दखल जग देखील घेतो. त्यामुळे आपली संस्कृती आपले विचार हे जगभरात पोहोचवण्यासाठी ब्लॉग आणि युट्युब हे प्रभावी साधन आहे असे मला वाटते. यापुढेही ब्लॉगच्या निमित्ताने युट्युब च्या निमित्ताने विविध विषय मांडण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा निश्चितच प्रयत्न राहील आपण वाचक या माध्यमातून यापुढेही जोडले जाऊ धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.