मुख्य सामग्रीवर वगळा

माझ गाव वडाचापाट.....


माझ गाव वडाचापाट.....
माझे मुळ गाव वडाचापाट. मालवणपासून 17 किमीवर आहे. वडीलांची नोकरी, आमचे शिक्षण या कारणांमुळे आम्ही मालवण येथे राहिलो. वडाचापाट येथे लहानपणी शाळेला मे महिन्यात सुट्टी असताना आम्ही सर्वजण गावी जायचो. पण त्यानंतर शिक्षण आणि रिपोर्टींगमुळे वडाचापाटला जाता येत नव्हते. गेलो तर एका दिवसातच परत यावे लागे. शनिवारी आजीची औषधे देण्यासाठी वडाचापाटला जाण्याची संधी मिळाली. शनिवारी सकाळी आकाशात पावसाचे वातावरण तयार झाले होते. परंतु सकाळी 9.30 वाजता आकाशात सुर्य दिसू लागला. त्यामुळे मी माझी प्लेझर गाडी बाहेर काढली. मास्क, रेनकोट परिधान करुन वडाचापाटला जाण्यासाठी निघालो. आडारी पूलापासून ते वडाचापाट पर्यंतचा प्रवास निसर्गाच्या सानिध्यातला होता. दोन्ही बाजूला गर्द झाडी, अधूनमधून पडणारा पाऊस, खळाळत वाहणारे ओढे मनात साठवत वडाचापाटला पोहचलो. वाटेत काही ठिकाणी शेतकरी शेताची कामे करताना दिसले. दरमजल करीत मसदे येथे पोहचलो. त्यानंतर आमच्या घरी जाण्यासाठी झरी येथील रस्त्यावर आलो. परंतु वहाळाला भरपूर पाणी आल्याने तिथून जाता आले नाही. त्यामुळे गाडी मागे घेऊन कुंभयातून आमच्या घरी पोहचलो. घरी आजीला औषधे दिली. काही वेळा निवांतपणे घरी बसलो. आमच्या घराशेजारील समीरच्या आईने हाक मारली, काय रे आई बरी आसा ना! मी तीला हो असे उत्तर दिले. समीरच्या आईला पाहताना जुन्या आठवणी दाटुन आल्या. समीर माझा बालपणीचा मित्र. मी गावी जायचो तेव्हा आवर्जून समीरसोबत क्रिकेट खेळायचो. पण 2011 मध्ये अपघातात समीरचा मृत्यू झाला. आता फक्त समीरच्या आठवणी मनात साठून राहिल्या आहेत. समीरची आई जेव्हा हाक मारते. तेव्हा आठवणी पुन्हा जाग्या होतात. आमच्या घरासमोरील फणसाचे झाड आहे. बालपणीचे खेळण्याचे ठिकाण. बालपणी आम्ही फसणाच्या झाडाखाली खेळायचो. मी गेली तीस वर्षे फणसाचे झाड पाहतोय अजूनही हे झाड तसेच आहे. आतेने दिलेला चहा, बिस्कीट खाऊन आजी, आत्तेचा निरोप घेऊन मालवणला जाण्यासाठी परत निघालो. वाटेत येताना आमच्या बागेपाशी थांबलो. बागेच्या शेजारी एक ओढा वाहतो. ओढ्याला आज भरपूर पाणी होते. त्यामुळे ओढ्यापाशी न थांबता मालवणच्या दिशेने निघालो. दोन तासाच्या प्रवासात अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.