लेट पण थेट.........
लेट पण थेट या वाक्याने समतादूत प्रकल्पाच्या पुणे येथील कार्यशाळेत अनेकांच्या मनावर गारुड केल होते. समतादूत प्रकल्पात असणाऱ्या अनेकांना हे वाक्य आजही स्मरणात असेल. आमचा माजी समतादूत सहकारी, पत्रकार आणि सध्या कोकण नाऊ चँनेलचा ब्युरो चीफ साईनाथ गावकरचे हे पेटंट वाक्य. दोन दिवसापूर्वी साईने नवीन फोर व्हीलर गाडी घेतली आणि त्याने सिद्ध केले ते म्हणजे लेट पण थेट. साईसोबत माझी ओळख समतादूत प्रकल्पात झाली. रायगडमध्ये माझ्या सोबत श्रीवर्धन तालुक्यात त्याने समतादूत म्हणून काम केले. साईच्या काही गोष्टी मला आवडत नाहीत त्या म्हणजे उशिरा उठणे, एखाद्या गोष्टीची तयारी फार उशिरा करणे. पण तरीही साई ग्रेट आहे. तो कोणतीही गोष्ट बिनधास्तपणे करतो. ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी लेखणी आणि आता चँनलच्या माध्यमातून तो अन्यायाला वाचा फोडतो. साईचा जनसंपर्क मोठा आहे. जनसंपर्काची व्याप्ती सिंधुदुर्गातच नाही तर ती अनेक जिल्ह्यामध्ये आहे. साई आपले मत एखाद्या व्यक्तीला ठामपणे पटवून देऊ शकतो. त्याचबरोबर तो एखाद्या व्यतीचे तो मतपरिवर्तनही करु शकतो. ज्या माणसांना साई भेटतो त्यांच्या तो थेट ह्दयात शिरतो हे साईचे वैशिष्ट्य आहे. साईने आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठे स्ट्रगल केले आहे. पत्रकारिता, फोटोग्राफी, मार्केटिंग एजन्सी, समतादूत पुन्हा पत्रकारिता असे साईचे स्ट्रगलिंग आहे. साईने अनेक संकटाचा सामना करुन सध्याची मजल मारली आहे. त्यामुळे आज या क्षणी साई मला ग्रेट वाटतो. साईची आई, वडील या दोघांवर नितांत श्रद्धा आहे. तो जीवनात सार काही मिळवतो ते आई वडीलांसाठीच असे मला प्रत्येक क्षणी वाटते. भाऊबीज प्रत्येक जण साजरी करतात पण बहिणबीज साजरी करुन बहिणीचा सन्मान करणारा साई ग्रेट आहे. कधी कधी साईचा स्वभाव मला आवडत नाही. त्याचे विचारही मला काही वेळेस पटत नाही. परंतु परिस्थितीचा बाऊ न करता एक सर्वसामान्य मुलगा सोशल मिडीयात जी भरारी घेत आहे ती कौतुकास्पद आहे. भले तो लेट असेल पण तो थेट आहे.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा