राजगृह - प्रेरणास्थान....
भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी मुंबई दादर येथे राजगृह हे निवासस्थान बांधून घेतले होते. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. परंतु ऐतिहासिक वास्तू असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आला. राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने एका संशयितास ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. राजगृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम सर्वश्रुत आहे. बाबासाहेब यांच्याकडे अनेक पुस्तकांचा संग्रह होता. बाबासाहेबांची ही ग्रंथसपदा राजगृह या निवासस्थानी ठेवण्यात आली आहे. डाँ. आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाने प्रेरीत होऊन समाजातील अनेक पिढ्या घडल्या आहेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकर दैनंदिन जीवनात ज्या वस्तू वापरायचे त्या वस्तू राजगृहात सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत. राजगृहाच्या ऐतिहासिक महत्वामुळे देशातील व परदेशातील नागरिक राजगृहाला भेट देतात आणि येथून प्रेरणा घेऊन जातात. राजगृहामधील ऐतिहासिक ठेवा देशातील भावी युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाने राजगृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य दक्षता घ्यावी जेणेकरून तोडफोडीसारख्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
(संग्राम कासले, मालवण)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा