मुख्य सामग्रीवर वगळा

संदर्भासह स्पष्टीकरण....


संदर्भासह स्पष्टीकरण....
काही दिवसांपूर्वी दहावीचे मराठीचे पुस्तक आँनलाईन पाहिले. पुस्तकात संदर्भासह स्पष्टीकरण हा प्रश्न दिसला नाही. त्यामुळे काही शिक्षकांशी चर्चा केली. चर्चेतून असे लक्षात आले की नवीन अभ्यासक्रमात संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाचा समावेश नाही. मला शालेय जीवनातील संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाची आठवण झाली. भंडारी हायस्कूलमध्ये असताना आम्हाला काही दिवसांसाठी आव्हाड सर नावाचे शिक्षक शिकवायला आले होते. त्यांनी फळ्यावर संदर्भ, स्पष्टीकरण, वैशिष्ट्ये असे लिहून एक नमुना आम्हाला दाखवला होता. त्यावरुन आम्ही थोडेफार संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला शिकलो होतो. परंतु खऱ्या अर्थाने  आम्हाला ध्रुवकुमार रानडे सरांनी संदर्भासहित स्पष्टीकरण हा प्रश्न सोडवायला शिकवला. दहावीत रानडे सरांनी आमच्याकडून प्रत्येक पाठ आणि कवितेचा सारांश दोन ते तीन ओळीत लिहून घेतला होता. त्यामध्ये पाठाचे नाव, लेखकाची माहिती, पाठाची थोडीशी माहिती अशा संदर्भाचा समावेश असायचा. सरांनी सर्व पाठ, कविता यांचे लेखक, कवी आमच्याकडे तोंडपाठ करुन घेतले होते. सरांचे असे म्हणणे होते की लेखकाचे नाव पाठ झाले की, लेखकाला पाठात काय सांगायचे आहे. एखादे वाक्य कशाच्या अनुषंगाने वापरले आहे. याचा उलघडा तुम्हाला होईल व त्यानुसार तुम्ही वाक्याचे स्पष्टीकरण व वैशिष्ट्य  लिहू शकाल. त्याचा परिणाम असा झाला की मराठी प्रश्नपत्रिकेमधील अनेक प्रश्नांची तयारी झाली. म्हणजे संदर्भासही स्पष्टीकरण, दिर्घोत्तरी प्रश्नांची प्रस्तावना, लघुत्तरी प्रश्नांचा आशय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला त्यातून उलघडत गेली. त्यामुळे मराठीचा पेपर आमच्यासाठी सोपा जात असे. रानडे सरांच्या या क्लुप्तीचा वापर मी मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असताना केला. सरांची क्लुप्ती तिथेही यशस्वी ठरली होती. 2012 ते 2014 या कालावधीत मराठी विषयाचा निकाल 100 टक्के लागला होता. तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले होते. लाँकडाऊन कालावधीत सर भाजी खरेदीसाठी बजारात येतात. माझ्या चेहऱ्यावर मास्क असेल तरीही ते मला बरोबर ओळखतात. माझी, निखिलची आवर्जुन चौकशी करतात. माझा लेख आवडला तर प्रसाद, करुणाला अवश्य सांगतात. असे ह न विसरता येणार आगळ वेगळ संदर्भात स्पष्टीकरण आहे.
(संग्राम कासले, मालवण)

टिप्पण्या

  1. atyanta sundar mitra...Tujhi lihinyachi paddhat mala khup avadte ...aapulki diste tyat nehami

    उत्तर द्याहटवा
  2. होय संग्राम सरांची हसत खेळत शिकवण्याची पद्धत अतीशय लोभसवाणी असे.माझ्यासाठी त्यांच्या ओळी असायच्या.. 'बालपणीचा काळ सुखाचा'. ह्याचा नेमका अर्थ संग्राम तुला आणि पहीलीतील काही निवडक मित्रांनाच ठावुक आहे. याचे संदर्भासह स्पष्टीकरण करायचे झाले तर माझीच फजिती व्हायची म्हणून एवढेच लिहीतो. बाकी रानडे सरांच्या सुखद आठवणीच्या हिंदोळ्यावर आम्हाला आज तुझ्या लेखणीतुन परत एकदा स्वार होता आले म्हणून तुझे आभार. रानडे सर नेहमी भेटले की आवर्जुन सगळ्यांची चौकशी करतात.सरांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान, सरांबद्दल काय आणि किती बाेलू, पाचवीत टाेपीवाला हायस्कूलमधे शिकवलेली रामरक्षा आज ३८ वर्षे स्मरणात आहे म्हणजे कशी शिकवली असेल याचे आजपण अप्रूप वाटते, सर म्हणजे एक महान विद्यापीठ आहे, पित्या समान गुरू भेटणे याला भाग्यच म्हणावे लागेल,

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.