खुशाल बोलते व्हा!.....
कोरोना कालावधीत सर्व काही बदलून गेले आहे. अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाले आहेत. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पगार कपातीची तर काहिंवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या सर्व घटनांचा परिणाम अनेकांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. लाँकडाऊन कालावधीत अनेकजणांना नैराश्य आले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या व्यक्तींना नैराश्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. मालवण येथील बँ. नाथ पै सेवांगणच्या कौटुंबिक सल्ला केंद्राच्यावतीने खुशाल बोलते व्हा हे अभियान सुरु आहे. लाँकडाऊन कालावधीत ज्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्या व्यक्ती निर्धास्तपणे बँ. नाथ पै सेवांगण कार्यालय - 02375-251255, 9960247698, 7038041294 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपल्या भावना, समस्या मांडू शकतात. मोबाईलवर संपर्क साधून समस्या मांडणार आहेत. त्यांचा खाजगीपणा जपण्याची खात्री सेवांगणने दिलेली आहे. त्यामुळे संपर्क साधणाऱ्या व्यक्ती निर्धास्तपणे बोलू शकतात. बँ. नाथ पै सेवांगण सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते. त्यांचा खुशाल बोलते व्हा हा उपक्रम नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा