नमस्कार आम्ही संग्राम सतीश कासले. माझे शिक्षण एम. ए.बी. एड, मास कम्युनिकेशन इन जर्नालिझम, एम. एस. डब्ल्यू झाले आहे. सध्या माझे एलएलबीचे शिक्षण सुरू आहे. मी मलेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. मी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करतो. हे समुपदेशन करत असताना अनेकजण प्रश्न विचारतात की समुपदेशन म्हणजे नक्की काय? त्यामुळे त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही विशेष ब्लॉग बनवला आहे. माझ्या मते समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणे. आता हा संवाद का साधावा लागतो. तर सध्याचे मनुष्याचे जीवन हे फार वेगवान झालेले आहे. त्यामुळे मनुष्य अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यापैकी ताणतणाव ही सध्याच्या काळातील माणसाची एक प्रमुख समस्या. आणि याच ताणतणावामुळे माणसाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच समस्यांवर आपल्याला उपाय शोधायचा आहे किंवा माणसांना बोलत करायचा आहे. यासाठीच समुपदेशनाच्या आवश्यकता असते. मला या सर्वांमध्ये विद्यार्थी समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचे वाटते. कारण सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा हे जग विस्तारत चालल्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने समुपदेशनाची गरज आहे. त्यातच कोणतं करिअर निवडावं? आपली आवड कशात आहे? आपण निवडलेल्या करिअरमध्ये भविष्यात यशस्वी होऊ की नाही यासारख्या अनेक शंका विद्यार्थी व पालकांच्या मनात असतात. या समस्यांवर मार्गदर्शन व काही प्रमाणात उपाय करण्यासाठी समुपदेशन हे अतिशय आवश्यक असते. आता या समुपदेशनाची फि आहे अतिशय कमी ठेवलेली आहे. आपण या समुपदेशनाची फी पाचशे रुपये एवथठेवलेली आहे. यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करायचे आहे त्यांच्याशी तीन वेळा संवाद साधतो. हा संवादाचा कालावधी पंधरा दिवसाच्या अंतराचा असतो. म्हणजेच पंधरा दिवसाच्या अंतराने तीन वेळा आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. व त्याच्या समस्यांचे निराकरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेवर देखील घेऊ शकतो. त्यामुळे या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. संग्राम सतीश कासले
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा