मुख्य सामग्रीवर वगळा

योजनेचे नाव - अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील बचतगटाना मिनीट्रॅक्टर/टॅक्ट्रर व शेती उपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणे


 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने बचतगटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात येत आहे. अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना मिनी ट्रॅक्टर व शेतीउपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना राबविली जाते. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ज्या अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटानी कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोस्ट कार्यालयाचे समोर सिंधुदुर्गनगरी किंवा तालुक्यातील समतादूताशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकणे यांनी केले आहे. 

अर्जासोबत बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वयंसहायता गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांकातील असावेत व ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. बचतगटातील सदस्याची यादी व पूर्ण नाव पत्ता, जात, संपर्क मोबाईल क्रमांक, बचतगटातील मागासवर्गीय सदस्याचे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशनिग कार्ड, झेरॉक्स प्रस्तावसोबत जोडणे आवश्यक आहे, बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत, बचत गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खोत असल्याचे व हे खाते सदर सदस्याचे आधार क्रमांकाशी सलग्न केलेले असावे. 

स्वयंसहायता बचत गटाने मिनीट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर 50 टक्के, आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर 50 टक्के किंवा मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती व आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर 100 टक्के अनुदान (3.15 लक्ष) बचत गटाचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे माहिती पत्रकात म्हटले आहे. 

समतादूत संपर्क क्रमांक 

विजय कदम 9119570426

संग्राम कासले 9420824874

सगुण जाधव 7066409995

सुजित जाधव 9422921882

सुदिप कांबळे 9960803301

श्यामल सावंत 9420726374

राजू दिनदयाळ 9421235704

सुहास मोचेमाडकर 8805269145

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.