डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती त्यांच्या वनंद या गावी उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनंद येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बार्टी तर्फे 15 टक्के दराने पुस्तक वाटप, उपस्थित लोकांसाठी मोफत भोजन, व संविधान प्रास्ताविका वाटप करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, विधी अधिकारी आयवळे, उपअभियंता आकाश कुऱ्हाडे, प्रकल्प अधिकारी योगेश कोलते, समतादूत विभागाचे रत्नागिरीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी आशिष कांबळे, सिंधुदुर्गचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत प्राजक्ता मराठे, सुदीप कांबळे, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, सगुण जाधव, महेश्वरी विचारे, रूपाली बाईत, राजू दीनदयाळ, आदी उपस्थित होते. यावेळी बार्टीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुस्तक वाटप स्टॉलकडे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जयंतीसाठी आलेल्या नागरिकांनी पुस्तकांची खरेदी देखील केली.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा