बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ कडून प्रतिनिधित्व करताना मला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने मी बऱ्याच दिवसांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटात पंधरा स्पर्धक सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी स्पर्धा आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक असते. स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धकांच्या आपल्याला मते समजतात, त्यांची बोलण्याची शैली समजते त्यांनी मांडलेले विषय समजतात. त्यामुळे आपण स्वतःमध्ये काही बदल करू शकतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील वक्तृत्व स्पर्धा ही अतिशय महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अवांतर वाचन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी व व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी महाविद्यालयीन किंवा शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा