सोशल माध्यमांच्या युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. घरामध्ये लहान मुले वाचताना दिसत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना मराठी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे गरजेचे आहे. वाचनामुळे मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजीत कार्यक्रमाप संगी बोलताना केले.
दिवाणी न्यायालय मालवण व मालवण तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते हे बोलत होते. यावेळी पत्रकार संग ाम कासले, सहायक अधिक्षक एम. जी. डीसोजा, एस. एन. पालव आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकते म्हणाले, आज पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. परंतु असे असले तरी मराठी भाषेविषयीची मुलांची ओढ कमी होउ देता कामा नये. त्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांनी स्वत वाचनाची सवय लावुन मुलांनाही वृत्तपत्र, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
याप्रसंगी बोलताना संग्राम कासले म्हणाले, युवा पिढी ग्रंथालयांमध्ये जाउन वाचन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे युवा पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेमध्ये दरवर्षी नवनवीन साहित्याची निर्मिती हो असते. त्याबाबत युवा पिढीला माहिती देणे आवश्यक आहे. वरिष्ठ लिपिक श्रीम. यु. एन. मालणकर, कनिष्ठ लिपिक एन. आर. कांबळी, एफ. ए. मेंडीस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले. सुत्रसंचालन एस. व्ही. जाधव यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा