दहा रुपयाचा वडापाव हे शीर्षक वाचून अनेकांना वेगळं वाटलं असेल. कारण सध्या वडापावचे दर हे वाढलेले आहेत. मी वडाचापाट येथे गेलो असता मला दहा रुपयाला वडापाव असा बोर्ड दिसला. मी त्या दुकानाच्या जवळ गेलो. आणि जवळून वडापाव पाहिले तर वडापाव ची साईज देखील मोठी होती. त्यामुळे मी उत्सुकतेने हॉटेलचे मालक यांना विचारले दहा रुपयाला वडापाव कसा काय? त्यावेळी ते मालक म्हणाले माझं नाव बाळापुर मी पेंडूरचा आहे पण मी मुंबईला असतो लालबाग चिंचपोकळी येथे माझा वडापावचा व्यवसाय आहे. मी दोन रुपयापासून वडापाव विकायला सुरुवात केली होती आज मी विकत असलेल्या वडापावची किंमत दहा रुपये आहे. अनेक जण माझ्याकडचा वडापाव लालबाग चिंचपोकळी येथे आल्यावर आवर्जून खातात. मी देखील दहा रुपयाच्या वडापावचा आस्वाद घेतला अतिशय अप्रतिम होता. तुम्ही कधी लालबाग चिंचपोकळीला गेला तर या वडापावचा आस्वाद अवश्य घ्या. बाळा परब संपर्क 9152141502
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा