स्वतंत्र सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंतीनिमित्त कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय लोकशाहीचे भवितव्य, सोशल मीडिया गुरफडलेली आजची तरुण पिढी, चांद्रयान मोहीम अभिमानास्पद पण वाढत्या बेकारीचे काय, शेतकरी राज्यात सुखी लोकशाहीत दुःखी, पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका, जागतिक अशांतता धार्मिक व आर्थिक असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मी या स्पर्धेसाठी सोशल मीडियात गुरफडली आजची तरुण पिढी हा विषय घेतला होता. एकूण दहा मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतांश स्पर्धकांनी सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुण पिढी हाच विषय घेतला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यस्तरीय स्पर्धेतील स्पर्धक कशा पद्धतीने असतात याची माहिती मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होताना अतिशय वेगळ्या पद्धतीची तयारीने जावे लागते हे देखील लक्षात आले. त्यामुळे आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होताना त्या विषयाच्या सर्व बाजूंनी विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने महत्वाची शिकवण मिळाली असे मला वाटते. स्पर्धेच्या परीक्षकांनी वक्तृत्व विषयी जी मते मांडली. ती देखील महत्त्वपूर्ण आणि भविष्यातील वक्तृत्व स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक अशी वाटली. या स्पर्धेचे नियोजन अतिशय छान व सुंदर पद्धतीने करण्यात आले होते. च्या विद्यार्थ्यांना आपण सुंदर बोलावेसे वाटते किंवा आपले वक्तृत्व चांगले व्हावेसे वाटते त्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत अवश्य सहभाग घ्यावा. कारण अशा राज्यस्तरीय स्पर्धांमधून तुम्हाला इतर स्पर्धकांची शैली, त्यांची बोलण्याची पद्धती, विषय कशा पद्धतीने हाताळावा, विषय किती वेळात संपवावा याबद्दल माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन, लेखन, मनन चिंतन या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्याचबरोबर वक्तृत्व हे देखील महत्त्वाचे आहे. वक्तृत्वामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होता येत. त्यामुळे आपले विचार आपण अतिशय चांगल्या व सोप्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक भाग घ्यावा
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा