रविवारी बऱ्याच दिवसांनी मी आणि पौर्णिमा हिने छत्रपती शिवरायांची सागरी राजधानी असलेल्या किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग हा प्रत्येकासाठी अभिमानाचा विषय आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपणा सर्वांना दिसते. सध्या किल्ले सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या मंदिरांचे बांधकाम रंगरंगोटी व इतर कामे सुरू आहेत. पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग येथे येत आहेत. किल्ले सिंधुदुर्ग मध्ये गेल्यानंतर नेहमीच आपल्याला प्रेरणा भेटत राहते. ती प्रेरणा असते छत्रपती शिवरायांची. जीवनात किती संकट येऊ पण आपण डगमगून चालणार नाही त्या संकटांचा निर्धास्तपणे सामना करा हेच छत्रपती शिवराय सांगत असतात. पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे अवश्य केले पाहिजे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा