सहा जानेवारी हा पत्रकार दिन. पत्रकारांचा हक्कांचा दिवस. सहा जानेवारी रोजी आम्ही मालवण मधील पत्रकार पत्रकार भवन ओरोस येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकारांची भेट घेता आली. खरोखरच पत्रकार दिनाचा दिवस अतिशय आनंदी वातावरणात गेला. मला महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेत काम करण्याची संधी मिळाली. दैनिक रत्नागिरी टाइम्स, तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये मला विविध विषयावर लिखाण करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमध्ये लिखाण करत असतानाच मी माझी शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. या कालावधीत वृत्तपत्र पदवी, एम एस डब्ल्यू, एल एल बी आदींचे शिक्षण मी पूर्ण केले. पत्रकारितेविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका अनेक प्रश्न असतात. पण खरोखरच ही पत्रकारिता कशी असते. तर माझ्या मते पत्रकारिता ही आनंददायी असते. पत्रकारितेमध्ये तुम्हाला फारसे मानधन मिळत नाही. कारण ही एक प्रकारची समाजसेवा आहे. त्यामध्ये तुम्हाला समाजाचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेता येतात. त्यावर उपाय किंवा मार्ग तुम्ही सुचवू शकता. आणि मुख्य म्हणजे तुमचा जनसंपर्क वाढतो. तुम्ही रोज अनेक व्यक्तींशी भेटत असता. आणि यातूनच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. पत्रकारितेचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल तर तुमचे सर्व विषयांचे वाचन वाढत जाते. आणि या सर्वांगीण वाचनाचा फायदा स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये होत असतो. पत्रकारितेमध्ये आल्यावर स्वतःचे असे वैयक्तिक जीवन फारसे नसतेच. तर पत्रकारिता हे आपल्या एक जीवनाचे महत्त्वाचे अंग भरून जाते. सकाळी उठल्यावर घरातून बाहेर पडल्यानंतर ज्या काही घटना आपल्यासमोर दिसतात. त्यातीलच एखाद्या घटनेतून बातमी मिळते आणि तिथूनच बातमीचा प्रवास सुरू होतो. या बातमीतूनच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येते त्याचबरोबर समता प्रबोधन देखील करता येते. त्यामुळे पत्रकारिता हे एक प्रकारे समाजसेवेचे व्रतच आहे. पत्रकारितेचा सर्वात महत्त्वाचा फायदा प्रत्येक पत्रकाराला होतो तो म्हणजे पत्रकाराचा आत्मविश्वास वाढलेला असतो. पत्रकारितेत घेण्यापूर्वी माझ्या मनात प्रचंड भीती होती. परंतु पत्रकारितेत आल्यावर अनेक लोकांशी बोलणे होते. पोलीस अधिकारी,तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रशासनतील व्यक्ती त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तींसोबत आपण न घाबरता न डगमगता बिनधास्तपणे बोलू शकतो. पत्रकारितेमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणी नवनवीन गोष्टी शिकता येतात हे देखील महत्त्वाचे असते. मला साधारण दहा वर्ष पत्रकारितेत काम करण्याची संधी मिळाली. आर्थिक समस्येमुळे मी पत्रकारित आलो. पण याच पत्रकारितेने जीवन काय असते हे मला शिकवले. मी पत्रकारितेत आणखी किती दिवस असेल हे मी देखील सांगू शकत नाही. कारण सध्या मी अनेक प्रकारच्या परीक्षा देतोय, अनेक प्रकारचे शैक्षणिक हा प्रयोग करतोय त्यामुळे यातून काहीतरी चांगले गवसेल हे देखील मला माहित आहे. परंतु पत्रकार व्यक्ती कुठेही गेला तरी तो आपली पत्रकारिता सोडत नाही. आणि सध्या तर युट्युब, इंस्टाग्राम, सोशल मीडिया याद्वारे आपण आपले विचार जगातील असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कुठेही असलो तरी आपण पत्रकारिता ही करू शकतो फक्त त्यांची माध्यम बदललेली असतील ठिकाण बदललेली असतील आणि संदर्भही बदललेले असतील. खर तर हा ब्लॉग पत्रकार दिनाच्या दिवशीच लिहायचा होता. परंतु घाई गडबडीत राहून गेला त्यामुळे हा ब्लॉग आजचा दिवशी लिहितोय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल अवश्य प्रतिक्रिया द्या.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा