दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचे निधन झाल्याची बातमी आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून समजली. क्षणभरासाठी त्यांनी दशावतारात साकारलेल्या विविध भूमिका डोळ्यासमोर तरळल्या. महाविद्यालयीन जीवनात पत्रकारिता करत असताना मला विरेश देऊलकर यांच्या निवासस्थानी सुधीर कलिंगण यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. या मुलाखतीत सुधीर कलिंगण मनसोक्त बोलले होते. मी त्यांना जुन्या काळातील दशावतार व सद्यस्थितीतील दशावतार यावर प्रश्न विचारला होता. त्यावर सुधीर कलिंगण यांनी दिलखुलास उत्तर देत म्हणाले, बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. नव्या पिढीला दशावताराकडे आणले पाहिजे. त्यासाठी नवीन गोष्टी दशावतारात आल्या पाहिजे. तु ट्रिकसीनयुक्त दशावतार बघ तुला नक्कीच आवडेल. सुधीर कलिंगण दशावतारात कोणतीही भूमिका साकाराताना त्या भूमिकेशी एकरूप होत. सुधीर कलिंगण यांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. दशावतार नाटकात सुधीर कलिंगण यांचे संस्कृत ऐकणे ही सुवर्णसंधी असायची. मी अनेक वेळा दशावतार नाटक त्यांचे संस्कृत ऐकण्यासाठी जायचो. सुधीर कलिंगण यांनी दशावतारात सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे नवीन पिढीतील अनेक तरुण त्यांची दशावतारी नाटक पाहण्यासाठी आवर्जून जात असत. दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा