आज फेसबुक वर सात वर्षांपूर्वीचा रायगड इंदापूर येथील फोटो पाहण्यात आला या फोटोशी अनेक आठवणी जुलै गेलेले आहेत तळा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत समता दूध प्रकल्प मार्फत मी आणि माझा मित्र दत्ता यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसंत सादरीकरण केलं होतं या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळालेला आहे रायगड जिल्ह्यातील काही भाग दुर्गम आहेत त्यामुळे समता प्रबोधन करण्यात अनेक अडचणी येत होत्या परंतु माझा सहकारी दत्ता त्याच बरोबर स्थानिक ग्रामस्थांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आम्हाला सहकार्य करून शाळेचे विद्यार्थी पथनाट्यासाठी उपलब्ध करून दिले त्यामुळे रायगड मधील आजूबाजूच्या भागांमध्ये आम्ही पथनाट्य सादर करू शकलो व भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुत्व हे विचार सर्वांपर्यंत पोहोचू शकलो आज या फोटोच्या निमित्ताने सात वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा