कणकवली हळवल येथील सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सविता संजय जाधव यांचा आज प्रथम स्मृतिदिन. सविता जाधव यांचे आमच्या परिवारातून अचानक जाणे हे आमच्यासाठी धक्कादायक होते. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत सविता संजय जाधव यांच्या आठवणी सदैव आमच्या सोबत होत्या. सविता जाधव यांचा परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी आम्ही जाधव परिवाराच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यांच्या आयोजन केले आहे. सविता यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज हळवल ग्रामपंचायत येथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर हळवळ ग्रामपंचायत येथे विधवा प्रथा आणि ग्रामस्थांची भूमिका या विषयावर मारुती जोशी काका यांचे प्रबोधन होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन हाच मुख्य हेतू आहे. सविता संजय जाधव यांच्या आठवणी आमच्या मनात कायम राहतील ते या उपक्रमाच्या निमित्ताने.अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी घेण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी आम्हा सर्वांना तुमचे सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा