भारतीय संविधानातील मूल्ये हि आपल्या दैनदिन जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. संविधानातील मूल्ये आचरणात आणणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन प्रबोधनकार मारूती जोशी यांनी विधवा प्रथा व ग्रामस्थांची भूमिका या विषयावर हळवल ग्रामपंचायत येथे बोलताना केले.
हळवळ ग्रामपंचायत येथे विधवा प्रथा व ग्रामस्थांची भूमिका या विषयावर मारूती जोशी यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनीकुमार कांबळे, विलास डिके, वंचितचे महासचिव प्रमोद कासले, वंचितचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, संजय तांबे, विजय हरकुळकर, सुषमा हरकुळकर, ग्रा. प. सदस्य उत्तम जाधव, सुदिप कांबळे, तनुजा बागबान, रूपाली उबाळे, उर्वी साटम, अक्षय कदम, अजय कदम, निलेश माळगावकर, दिनेश मोरे, संग्राम कासले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मारूती जोशी म्हणाले, भारतीय संविधानाने स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रियांनी संविधानातील मुल्ये व तत्वे आचरणात आणली पाहिजे. जुन्या रूढी परंपरेने स्त्रीयावंर बंधने लादली होती. परंतु संविधानाने हि बंधने नष्ट केली. भारताचे संविधानान स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा हक्क देते. त्यामुळे माfहलांनी ठामपणे जुन्या रूढी परंपरेला विरोध केला पाहिजे. यावेळी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेती विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम जाधव यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा