शैक्षणिक वर्ष 2022 - 23 यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर, शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्याबाबत अनुसूचित जाती, इमाव, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी समाज कल्याण सिंधुदुर्ग (02362 - 228882) तसेच समतादुतांशी संपर्क साधावा. शामल सावंत कणकवली - 9420726374, राजू दिनदयाळ वैभववाडी- 9421235704, सगुण जाधव सावंतवाडी - 7066409995, सुदीप कांबळे देवगड - 9960803301,सुहास मोचेमाडकर दोडामार्ग- 8805269145, सुजित जाधव वेंगुर्ला - 9422921882, विजय कदम कुडाळ - 9119570426, संग्राम कासले मालवण - 9420824874
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा