मिस्टर 360 डिग्री..........
काही दिवसांपूर्वी पत्रकार आणि अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, की काही मित्रांच्या मते, त्याची पत्रकारिता ही सीआरझेडप्रमाणे 500 मीटरच्या आत राहिली' या पोस्टखाली महेंद्रचे समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट पडल्या होत्या. त्यामुळे महेंद्र आणि त्याची पत्रकारिता याबाबत लिहिने मला आवश्यक वाटते. महेंद्र 2004 पासून पत्रकारितेत आला. 2004 ते 2015 कालावधी महेंद्रने दै. तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर तो फ्रिनाल्सकडे वळला. मी माझ्या शालेय जीवनापासून महेंद्रची पत्रकारिता पाहिली आहे. माझ्या मते महेंद्रची पत्रकारिता 500 मीटर पर्यंत मर्यादित नक्कीच नाही तर ती 360 डिग्रीप्रमाणे सर्व घटकांवर भाष्य करणारी आहे. महेंद्रला नाट्य, चित्रपट क्षेत्राविषयी सखोल ज्ञान आहे. नाट्य व चित्रपटाची समीक्षा तो उत्तम पद्धतीने मांडतो. तो स्वतः अभिनेता असल्याने नाटक व चित्रपटाशी संबंधित अनेक बाबी त्याला माहित आहेत. याचा उपयोग त्याने अनेक चित्रपट, नाट्य अभिनेत्यांना प्रश्न विचारताना बखुबीने केला आहे. अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी तसेच अनेक अभिनेत्यांच्या त्याने घेतलेल्या मुलाखतीवरून आपणाला दिसू येईल. या मुलाखतीतून त्याने कलाकारांबद्दलची विविधांगी माहिती वाचकांपर्यंत पोहचवली आहे. त्याने घेतलेल्या प्रत्येक मुलाखतीत कलाकाराचे वेगळेपण दिसून येते. महेंद्र हा उत्तम गायक आहे. तो असंख्य जुनी गाणी म्हणत असतो. मराठी व हिंदी चित्रपटाचे गीतकार, संगीतकार त्याच्या तोंडपाठ आहेत. महेंद्रचे संगीत विषयक ज्ञान तुम्हाला पहायचे असेल तर देऊळवाडा झालेल्या सिंधुमहोत्सावतील कार्यक्रमांचे महेंद्रने केलेले रिपोर्टींग पहावे लागेल. सिंधुमहोत्सवात सुखविंदर सिंग, सोनु निगम या गायकांनी आपली गीते सादर केली होती. त्यावेळचे रिपोर्टींग करताना महेंद्रने गायकांची पार्श्वभूमी, स्टग्रल याचीही माहिती रिपोर्टींगमधून दिली होती. चिवला बीच येथे झालेल्या बीच फेस्टिव्हलमध्ये ज्ञानेश्वर मेश्राम याने सादर केलेल्या गीतावरून महेंद्रने तत्कालीन राजकीय स्थितीवर भाष्य केले होते. मला वाटत हे महेंद्रच्या पत्रकारितेचे वेगळेपण आहे. क्रिडा हे महेंद्रचे आवडते क्षेत्र. पत्रकारितेप्रमाणे क्रिकेटही तो आपले सर्व कौशल्य पणाला लावून खेळलो. क्रिकेट खेळण्यासोबतच तो समलोचनही सुंदर पद्धतीने करतो.द्वारकानाथ संझगिरीसह अनेक क्रिकेटपट्टूंच्या मुलाखती महेंद्र घेतल्या आहेत. सावंतवाडीत झालेल्या युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट मँचचे रिपोर्टींगही महेंद्रने सुंदर पद्धतीने केले होते. महेंद्रला मालवण ते महाराष्ट्र असे राजकारणाचे उत्तम ज्ञान आहे. मालवण नगरपालिकेत रिपोर्टींग करताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहांवरही महेंद्रची लेखणी बरसायची. भुयारी गटार योजनेवर महेंद्रने सातत्याने लेखन केले आहे. पेनड्राईव्हच्या माध्यमातून महेंद्रने नगरपालिकेतील असंख्य विषयांवर सडेतोड लेखन केले आहे. मालवणमधील प्रभानिहाय राजकीय परिस्थिती महेंद्र उत्तम जाणतो. संख्याशास्त्राच्या आधारे महेंद्र प्रभागनिहाय निवडणूकीचे विश्लेषण चांगल्या पद्धतीने मांडलेले आहे. पर्यावरण संवर्धनावर महेंद्रने सातत्याने लिहले आहे. कांदळवन संवर्धन हा विषय महेंद्रने सातत्याने मांडला आहे. पर्यावरणच्या आड येणारा प्रत्येक घटकावर महेंद्रने आपल्या लेखणीतून मांडला आहे. मासेमारी या विषयावर महेंद्रने भरपूर लेखन केले आहे किंबहुना अजूनही तो करतो. महेंद्र मच्छीमार समाजात जन्मला, वाढला, मोठा झाला. त्यामुळे ज्या समाजात आपण वाढलो त्याचे आपण देणे लागतो हे महेंद्र जाणतो. त्यामुळे महेंद्र सातत्याने पारंपरिक मच्छीमार आणि त्याच्या समस्या यांवर लिहित आहे. महेंद्रने मच्छीमारीशी निगडित समस्यांचा स्वतः सामना केला आहे. त्यामुळे त्याला या समस्यांची तीव्रता माहित आहे. म्हणूनच तो सातत्याने या विषयावर लिहित असतो. महेंद्रने आजपर्यंत कोणत्या विषयावर लिहिल आहे आहे हे पाहण्यासाठी त्याची असंख्य कात्रणे तुम्हाला पहावी लागतील तरच महेंद्रच्या पत्रकारीतेची व्याप्ती समजले.
संग्राम कासले, मालवण

अगदी बरोबर लिहले आहे. 500 मीटरचा भाष्य कोणी केले माहीत नाही. पण त्यावेळीही वाचताना पटले नाही. कदाचित पंख पसरवून महेन्द्रजीनी झेप घ्यावी असे कुणाला वाटले असेल म्हणूनही असेल. मी आणि महेन्द्र मत्स्य व्यवसायीकाच्या समस्या शास्त्रीय आधारावर कश्या सोडवता येतील या समान सूत्राने मित्र आहोत. त्यात प्रत्येक वेळी आमचे म्हणणे एकमेकां पटते असे नाही, तरी सुद्धा मैत्री तुटली नाही. महेन्द्र जे काम करतो ते मन लावून आणि परिपूर्ण. हा माझा अनुभव. 360° हे खूप महत्वाचे, त्यामुळेच महेन्द्र समाधानी व लोकप्रिय.
उत्तर द्याहटवा