मुख्य सामग्रीवर वगळा

आमचे संगीत सुपरस्टार.....


आमचे संगीत सुपरस्टार..... 
मळलेल्या वाटेने सर्वजण चालतात मात्र काहीजण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करुन स्वतःची ओळख निर्माण करतात.  भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी  आणि माझे मित्र प्रसाद रानडे, करुणा रानडे, मानेंद्र आचरेकर यांनी संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून स्वतः ला सिद्ध केले आहे. हे सर्वजण आमच्यासाठी संगीत सुपरस्टार आहेत. मी सुरुवात करतो प्रसाद आणि करुणा यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाबद्दल. प्रसाद आणि करुणा यांना बालपणापासून संगीताचे धडे मिळाले आहेत. भंडारी हायस्कूलचे शिक्षक आणि आमचे गुरुवर्य ध्रुवकुमार रानडे हे करुणाचे बाबा तर प्रसादचे काका. रानडे सरांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी संगीताचे धडे गिरवले आहेत. शालेय जीवनात दोघांनीही गीतगायन स्पर्धेत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. प्रसाद उत्कृष्ट गायक, संगीतकार, गीतकार आहे. प्रसाद आणि करुना दोघेही तबला वाजवतात. आम्ही कणकवलीला सादर केलेल्या बाप्पा मोरया या एकांकिकेत करुणाने तबला वादन करून सर्वांना अचंबित केले होते. शालेय जीवनापासून प्रसाद आणि करुणाने संगीताची आवड जोपासली. दोघांनीही आपल्या आवडीचे रुपांतर करीअरमध्ये केले. करुणाचे शास्त्रीय गायन अप्रतिम आहे. करुणा विविध ठिकाणी आपली गाणी सादर करत असते. प्रसादही सर्व गायन प्रकारामध्ये पारंगत आहे. प्रसादच्या अनेक गाण्यांचे अल्बम गाजले आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत प्रसाद गीतांच्या मैफीली करत असतो. युट्यूबवर प्रसादच्या गीतांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद आणि करुणा यांच्याबरोबरीने मानेंद्र आचरेकर यानेही संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मानेंद्रला संगीत क्षेत्राची पार्श्वभूमी नाही. पण तरीही संगीताची आवड व निरीक्षण यामुळे मानेंद्रने संगीत भेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.मानेंद्र चांगला अभिनेता आहे. तो आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण योग्य पद्धतीने करतो. या सर्वांचा प्रभाव त्याच्या गीतांमध्ये दिसतो. मालवणच्या दर्यात या मानेंद्रच्या गीतात मालवणचे प्रतिबिंब दिसते. त्याचबरोबर मच्छीमार समाजाची संस्कृती, मच्छीमार समाजातील नवयुवकांनी निवडलेली रोजगाराची साधने हे स्थित्यंतर मानेंद्रच्या गीतात दिसते. त्यामुळे हे गीत अबाल वृद्धांसह सर्वांनाच आवडते. मानेंद्रचे मालवणच्या दर्यात हे गीत युट्यूबवर जबरदस्त हिट ठरत आहे. मानेंद्र सध्या विविध गाण्यांचे लेखन करत आहे. लवकरच त्याची आणखी गाणी युट्यूबद्वारे रसिकांपर्यंत पोहचतील. आमचे तीनही संगीत सुपरस्टार त्यांच्या नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. लवकरच त्यांच्याकडून संगीताची मेजवानी आम्हाला मिळणार आहे. प्रसाद, करुणा, मानेंद्र हे शालेय जीवनात अभ्यासातही हुशार होते. पण त्यांनी संगीताची आवड जोपासून संगीत क्षेत्रात करीअर केले. त्यांचा हा प्रवास संगीत क्षेत्रात करीअर करु इच्छिणाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक आहे. 
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.