मुख्य सामग्रीवर वगळा

मालवण प. स.चे विद्यालय अँप


मालवण प. स.चे विद्यालय अँप
कोरोना कालावधीत लाँकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना तीन महिने घरीच रहावे लागले आहे. अशा परिस्थितीत शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सोमवारी शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. रेडझोनमध्ये असणाऱ्या शाळा सद्यस्थितीत बंद राहणार असून विद्यार्थ्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन शाळा सुरु होणार आहेत. परंतु या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आँनलाईन शिक्षणाचा देखील एक पर्याय असणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मालवण पंचायत समितीच्या टिमने विद्यालय हे अँप विकसित केले आहे. मालवण पं.स.चे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सर्व प.स.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांच्या टिमने विद्यालय अँप विकसित केले आहे. या अँपचे उद्घाटन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तिसरी ते सातवी पर्यंतचा इयत्तावार अभ्यासक्रम या अँपमध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील पाठांच्या स्मार्ट पीडीएफ बनविण्यात आल्या आहेत. अँपमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाठाची युट्यूब लिंक देण्यात आली असून इंटरनेटची सुविधा असल्यास लिंकवरून विद्यार्थ्यांना धडे अभ्यासता येणार आहेत. प्रत्येक पाठाखाली स्वाध्याय देण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कँन करुन विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करता येणार आहे. या अँपचा उपयोग करण्यासाठी अँपमधील पाठाचा भाग डाऊनलोड करून घ्यावा लागणार आहे. यानंतर आँफलाईन पद्धतीने विद्यार्थी पाठाचा अभ्यास करु शकतात.विद्यालय अँप बनविण्यासाठी अमर वाघमारे, गुरूनाथ ताम्हणकर, विनीत देशपांडे, दिनकर शिरवलकर, परशुराम गुरव, भागवत आवचार, नंदकिशोर हळदणकर यांनाही मेहनत घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनापर्यंत विद्यालय अँप पोहचल्यास विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे. परंतु ज्या ठिकाणी इंटरनेटची सोय नाही अशा ठिकाणी अन्य माध्यमाद्वारे हे अँप पोहचवावे लागणार आहे. त्यासाठी मालवण प. स. टिम, तालुक्यातील शिक्षक निश्चितच मेहनत घेतील. मालवण पंचायत समितीने राबवलेला हा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असून यापुढेही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणारे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा आहे. 
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.