जुन्या आठवणी........
काल रात्री आमच्या आँफिसमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजा खांडाळेकर आले होते. मी त्यांना साप्ताहिक व दैनिक याबद्दल माहिती विचारली. राजा भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता आठवणींचा पेटारा माझ्यासमोर उलघडला. राजा भाऊ 1975-76 सालातील पत्रकारितेबद्दल ते बोलत होते. मुंबईतून येणाऱ्या वृत्तपत्रातून स्थानिक बातम्या येत नव्हत्या. स्थानिक बातम्या फक्त साप्ताहिकामधूनच यायच्या. साप्ताहिकाच्या संपादकालाच बातम्यांशी संबंधित सर्व कामे करावी लागायची. स्पाँटवर जाऊन बातमी घेणे, संकलन करणे, छपाई करणे ही सर्व कामे जिकरीची असायची तरीही संपादक ती कामे आनंदाने करायचे.ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे दहावी परीक्षेत पहिले आल्याचे वृत्त ह.मो. यांना त्यांच्या शेजारी येणाऱ्या जनयुग साप्ताहिकामधूनच समजले होते. सदा वराडकर यांनी वस्त्रहरणचे परीक्षण साप्ताहिकातून लिहिले होते. त्या परिक्षणाचे दस्तुरखुद्द स्व. मच्छिंद्र कांबळी यांनी कौतुक केले होते. कालांतराने वर्तमानपत्रांमध्ये स्थानिक बातम्यांना स्थान मिळू लागले. आणि साप्ताहिक वाचन करण्याचे प्रमाण कमी होत गेले. राजा भाऊंच्या बोलण्यातून एक जाणवले साप्ताहिकांनी वाचन संस्कृतीची चळवळ जोपासली. जुन्या काळातील घटलेल्या घटनांची माहिती आपल्याला साप्ताहिकातून मिळू शकते. साप्ताहिकांमुळे मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना स्थानिक बातम्या समजत होत्या.आज सोशल मिडिया व विविध माध्यमातून स्थानिक घडामोडी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. तरीही साप्ताहिकांचे वृत्तपत्रसृष्टीतील स्थान नाकारुन चालणार नाही. संग्राम कासले. मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा