मुख्य सामग्रीवर वगळा

दत्ता.....


दत्ता.....
पुणे येथील समतादूत प्रकल्पाच्या ट्रेनिंगमध्ये माझी दत्ता गायकवाड या पुणे येथील मित्राशी ओळख झाली होती. मला वाटले होते ही ओळख ट्रेनिंग पुरतीच मर्यादित राहिल पण तसे घडले नाही समतादूत प्रकल्पाच्या निवडीत मला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका मिळाला होता. माझा ग्रामसेवक मित्र नितेश तांबे याने मला तळा येथील त्याचा मित्र ग्रामसेवक अतुल इंगळे याचा संपर्क नंबर दिला होता. त्यानुसार मी तळा येथे गेलो. एक रात्र अतुलकडे राहिलो. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून खोली शोधण्याची मोहिम हाती घेतली. खोलीसाठी शोधमोहीम राबवताना लक्षात आले की दत्ता तळा तालुक्यात राहतो. मी दत्ताची भेट घेतली आणि खोली शेअर करण्याविषयी विचारले. दत्ताने लागलीच होकार दिला आणि आम्ही तळा येथे एकत्र राहू लागलो. अकरा महिने मी आणि दत्ता तळा येथे राहिलो. या कालावधीत दत्ताकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. दत्ता हा उत्तम फोटोग्राफर आहे. पुणे जुन्नर येथे त्याने काही काळ फोटोग्राफी केली. याच दरम्यान तो स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास करायचा. तळा येथेही दत्ताने स्पर्धा परीक्षेची भरपूर पुस्तके आणली होती. दत्तामुळे मला देखील स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि मी स्पर्धा परीक्षांचे फाँर्म भरु लागलो. समतादूत प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही रायगड जिल्ह्यातील बहुतांश शाळा, मागासवर्गीय वस्ती, आदिवासी पाडे यांना भेटी दिल्या. आदिवासी पाड्यांवर आम्हाला चालत जावे लागे. खोलीवर येईपर्यंत भरपूर उशिर होत असे. दत्ता सकाळी निघतानाच एक प्लँन बनवायचा. सकाळी उठल्यावर दत्ता भरपूर पोहे बनवायचा. पोहे खाऊन आम्ही बाहेर पडू त्यानंतर नाष्टा नाही मग दुपारी ऊसाचा रस, कुठेतरी नाष्टा असे करत समताप्रबोधन करीत आम्ही खोलीवर परतत असू. रात्रीच्या जेवणासाठी अंडी, बटाटी हा मेनू असायचा. आमचे मित्र अँड. डुबे आले की चिकनचा बेत व्हायचा. द्ताने या अगोदर जेवण बनवले नव्हते पण परिस्थितीने तो शिकला होता. दत्ता इतरांना मदत करायला नेहमी तत्पर असतो. कुणाला रात्री अपरात्री घरी सोडणे, दवाखान्यात घेऊन जाणे, मित्रासाठी झेराँक्स खरेदी करणे, मित्रांची परीक्षा फी भरणे, मित्रांना आर्थिक मदत करणे ही कामे तो मनापासून करायचा. समतादूत प्रकल्पाचा करार संपल्यावर दत्ता पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेला होता. वर्षभर अँकडमीत त्याने अभ्यास केला. परंतु स्पर्धा परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. अजूनही दत्ता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. दत्ता सध्या पोलादपूर तालुक्यात सीएम फँलोशिप या प्रोजेक्टवर काय करतोय. मित्रांना मदत करण्याची त्याची वृत्ती आजही कायम आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तो अनेकांना प्रेरणा देतो. स्पर्धा परीक्षा देत रहायच्या कधीतरी नक्कीच यश मिळेल असे तो मित्रांना नेहमी सांगतो. दत्ता एकट राहणे जास्त पसंत करतो. तो फारसा आपल्या घरी जात नाही. मित्रांमध्येच तो रमतो. घरी आई वडीलांची फोनवरून खुशाली घेतो. मला त्याची ही गोष्ट खटकते. मित्राप्रमाणेच त्याने घरच्यांनी वेळ द्यायला हवा असे मला मनापासून वाटते. आज दत्ताचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!   
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.