भूष.........
पत्रकारिता, फोटोग्राफी, पेंटिंग, काव्यलेखन याचा कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना मालवणमधील भूषण मेतर या उदयोन्मुख लेखक, कवी, पत्रकाराने अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. बालपणीच वडीलांचे छत्र हरवलेला भूषण हा संवेदनशील मनाचा आहे. त्याच्या कवितांमधून संवेदनशील मनाचे दर्शन घडते. भूषणच्या कविता या समाजातील सर्व घटकांचा वेध घेणाऱ्या आहेत. मैत्री, प्रेम, शाळा, पारंपरिक मच्छीमार, मत्स्यसंस्कृती, किनारपट्टीवर येणारी वादळे या सारख्या घटनांना भूषणने कवितेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मांडले आहे. भूषण हा उत्तम चित्रकार आहे. शालेय जीवनात त्याने असंख्य चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमध्ये त्याने समाजमनाचा वेध घेतलेला दिसतो. पत्रकारितेच्या निमित्ताने भूषण शहरी व ग्रामीण भागात सातत्याने भ्रमंती करत असतो. ही भ्रमंती करताना त्याने कँमेराने केलेले क्लिक अफलातून आहेत. मालवण राँक गार्डन, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, चिवला बीच, बंदरजेटी, मालवण किनारपट्टी ही भूषणने व्लिक केलेली छायाचित्रे सर्वांच्या पसंतीस उतरलेली आहेत. छायाचित्र, काव्यलेखन हा छंद जोपासताना पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाजप्रबोधन करण्याचे काम भूषण गेली आठ वर्षे करत आहे. वेगवेगळ्या समस्या भूषणने वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून भूषण नेहमी अँक्टीव्ह असतो. फेसबुकवर त्याचा प्रचंड मित्रपरिवार आहे. दिवसभरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी भूषणने खबरनामा सुरु केला होता. सध्या हा खबरनामा बंद आहे. त्याने खबरनामा पुन्हा सुरु करावा असे मी त्याला सुचवेन. सामाजिक उपक्रमातही भूषण सक्रिय असतो. साहित्य सहवास, भंडारी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना या सारख्या संघटनांद्वारे तो आपले सामाजिक योगदान देत आहे. भूषण याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! (संग्राम कासले, मालवण)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा